SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. विलास व्ही. कारजिन्नी यांना ज्येष्ठ अभियंता (‘सीनियर इंजिनिअर) ऑनर २०२६’ पुरस्कारजागतिक खगोलशास्त्र दिन: अंतराळाचे रहस्य उलगडण्याचा दिवसशहापुरात मोठी कारवाई: ५ लाख ४ हजार रुपयांच्या एम.डी. ड्रग्जसह दोन आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखा आणि शहापूर पोलिसांची संयुक्त मोहीमकोल्हापुरात मोठी कारवाई: ७ किलो अफू पावडरसह राजस्थानी इसम गजाआड; १ लाखाचा मुद्देमाल जप्तकृष्णा नदीपात्रात ७०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग; पाटबंधारे विभागाला आमदार यड्रावकर यांच्या सूचना गौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज; ३०० आयशर, ६५० हमालांसह अडीच हजारांहून अधिक कर्मचारी तैनातवारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीत आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनीचा प्रवेशआयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ. महादेव नरके यांची बिनविरोध निवडपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिनाभरात ५३ लाख ८२ हजाराची वसुली आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन: समान कामासाठी समान वेतन का गरजेचे?

जाहिरात

 

कृष्णा नदीपात्रात ७०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग; पाटबंधारे विभागाला आमदार यड्रावकर यांच्या सूचना

schedule18 Sep 26 person by visibility 332 categoryराज्य

जयसिंगपूर : लांबलेला पाऊस, खरीप हंगामातील पिकांना भासणारी पाण्याची गरज ओळखून कोरड्या पडलेल्या कृष्णा नदी पात्रात शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाला संपर्क साधून वारणा धरणातून कृष्णा नदीपात्रात ७०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कृष्णा नदीपात्रात लवकरच पाणी प्रवाहित होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांना पाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांमध्येही पाण्याबाबत चिंता व्यक्त होत होती. नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाल्याने तसेच पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके अडचणीत सापडली होती.
या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांनी आमदार यड्रावकर यांच्याकडे कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली.

 शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन आमदार यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार वारणा धरणातून ७०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी शनिवारी सायंकाळपर्यंत नदीपात्रात पोहोचणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी पाणी उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes