पिरवाडी येथे हातभट्टी दारूविरुद्ध संयुक्त कारवाई
schedule22 Jun 26 person by visibility 116 categoryगुन्हे
कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या निर्देशानुसार रविवारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.2, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, करवीर पोलीस ठाण्याचे अंमलदार ,अन्न औषध प्रशासनचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समवेत पिरवाडी येथे हातभट्टी दारू विक्री करणारी बेबी रवी मछले ही संशयित महिला विनापरवाना अवैधपणे देशी व विदेशी दारू विक्री करताना मिळून आल्याने या महिलेविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) अन्वये गुन्हे नोंद करण्यात आला.
पिरवाडी गावातील बेबी रवी मछले या महिलेवर सन 2025 पासून ते आज अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण 11 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
गावठी हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व ग्रामपंचायातींनी ग्रामरक्षक दलाची स्थापना करावी तसेच अवैध गावठी हातभट्टी दारूची विक्री, निर्मिती किंवा वाहतूक याची माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र.18002339999 या क्रमांकावर किंवा whatsapp क्र. 8422001133 या क्रमांकावर संपर्क साधावा.
या कारवाईवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक युवराज शिंदे, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक पी.आर. खरात, उप निरिक्षक के.एस. पाटील, यु.जी. कांबळे, ए.टी.घोसाळकर, एस.डी. राजगुरू, पांडुरंग घुगे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी श्रद्धा साळुंके, पोलीस अंमलदार प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण , राज्य उत्पादन शुल्काचे, जवान सर्वश्री देवेंद्र पाटील, संदीप हालुंडे, संदेश कोळी, आशिष पोवार, सुशांत पाटील, आदर्श धुमाळ पिरवाडीच्या सरपंच अनिता खोत , पोलीस पाटील राजश्री जाधव आदी उपस्थित होते .