SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
१० हजार जणांना मिळणार रोजगारांची संधी ; आमदार यड्रावकरांच्या पाठपुराव्याला मोठे यशडी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरला प्रतिष्ठेची ‘आर्किटेक्ट लुईस आय. कान ट्रॉफीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज करावेतकोल्हापूरसह चार जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या सराईत चेन स्नॅचर टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी गजाआडपिरवाडी येथे हातभट्टी दारूविरुद्ध संयुक्त कारवाईजयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र देशात आदर्श ठरणार : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकरजागतिक वर्षावन दिन: पृथ्वीच्या फुफ्फुसांचे संरक्षण काळाची गरज बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा, योग साधना ही जीवन पध्दती बनवण्याची गरज : खासदार धनंजय महाडिकऑलिंपिकपटू बंडा पाटील यांना 'खाशाबा जाधव' पुरस्कार जाहीरआंतरराष्ट्रीय योग दिवस: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत योगाभ्यास

जाहिरात

 

कोल्हापूरसह चार जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या सराईत चेन स्नॅचर टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी गजाआड

schedule22 Jun 26 person by visibility 132 categoryगुन्हे

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांना लक्ष्य करून या आरोपींनी चैन स्नॅचिंगचे सत्र सुरू ठेवले होते, ज्यामुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक नीलोत्पल साो यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुन्ह्याच्या पद्धतीचे सखोल विश्लेषण करून तपासाला सुरुवात केली.

तपासादरम्यान हे गुन्हे रेकॉर्डवरील आंतरराज्य गुन्हेगार वैभव नारायणराव आडोळे (वय २६, मूळ रा. येरला, ता. मोरशी, जि. अमरावती, सध्या रा. हिंजवडे, पुणे) याच्याकडून होत असल्याचे निष्पन्न झाले. वैभव आडोळे याच्यावर २०१५ ते २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत ६० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून, तो सराईत गुन्हेगार आहे. आरोपी मोबाईलचा वापर करत नसल्याने त्याचा शोध घेणे आव्हानात्मक होते, मात्र पथकाने पुण्यातील त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी १० दिवस पाळत ठेवून त्याला त्याच्या साथीदारासह, करण गोरख जगधने (वय १९, रा. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. औंध, पुणे), शिरवळ (जि. सातारा) परिसरातून ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून १०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन मोटर सायकली असा एकूण १४,९२,१८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींच्या अटकेमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील चैन स्नॅचिंगचे १० आणि मोटर सायकल चोरीचे २ असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. 

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल  आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes