SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलनकोल्हापुरात खळबळ: भाऊसिंगजी रोडवरून ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास!घोडावत विद्यापीठातील 49 विद्यार्थ्यांची निवडप्रतीक्षा संपली! डॉ. रजनीश कामत शिवाजी विद्यापीठाचे नवे कुलगुरूस्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांचे श्रेय नाकारून धैर्यशील देसाई यांनी त्यांचा अपमान करू नये खरीप हंगाम 2025 पीकस्पर्धा निकाल जाहीर; राज्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अव्वल क्रमांकमातृत्व ग्रुप आयोजित रक्तदान, मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरास कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभकोल्हापूर महापालिकेत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञासार्जंट शौर्या अश्वीन शिंदेला बेस्ट कॅडेट अवॉर्डकोल्हापूर जिल्ह्यातील लहान मुलांसाठी 31 मे रोजी मोफत हृदय तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर

जाहिरात

 

प्रतीक्षा संपली! डॉ. रजनीश कामत शिवाजी विद्यापीठाचे नवे कुलगुरू

schedule21 May 26 person by visibility 73 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची गेल्या नऊ महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी डॉ. रजनीश कमलाकर कामत यांच्या नावाची विद्यापीठाचे नवे पूर्णवेळ कुलगुरू म्हणून घोषणा केली आहे. डॉ. दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त होते, ज्यावर आता डॉ. कामत यांची नियुक्ती झाली आहे. कुलगुरू निवडीसाठी गठित करण्यात आलेल्या विशेष समितीने निवडलेल्या अंतिम उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांची ही नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वयाच्या ६५ वर्षांपर्यंत असणार असून, ते आजपासून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
डॉ. रजनीश कामत हे शिवाजी विद्यापीठासाठी नवे चेहरा नसून त्यांचा या परिसराशी जुना संबंध आहे. त्यांनी याच विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात एम.एस्सी. पूर्ण केली असून, पुढे गोवा विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळवली.

 त्यांनी शिवाजी विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) म्हणून प्रदीर्घ काळ काम पाहिले आहे. त्यांच्याकडे २८ वर्षांपेक्षा जास्त अध्यापन, संशोधन आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे.

 आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे २११ हून अधिक संशोधन पेपर प्रसिद्ध झाले असून, त्यांनी १६ पुस्तकेही लिहिली आहेत.
डॉ. कामत यांच्याकडे मुंबई येथील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरुपद सांभाळण्याचा, तसेच राज्यातील इतरही काही विद्यापीठांच्या प्रभारी कुलगुरुपदाचा यशस्वी अनुभव आहे. आता त्यांच्या या पूर्णवेळ नियुक्तीमुळे शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे, उद्योग आणि विद्यापीठ यांच्यात समन्वय साधणे आणि स्थानिक संशोधनाला मोठी जागतिक गती मिळवून देणे, या गोष्टींना प्राधान्य मिळण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी निश्चितपणे होईल, अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes