कोल्हापुरात खळबळ: भाऊसिंगजी रोडवरून ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास!
schedule21 May 26 person by visibility 97 categoryगुन्हे
कोल्हापूर: शहरातील गजबजलेल्या भाऊसिंगजी रोड परिसरात दोन चोरट्यांनी एका १८ वर्षीय मुलाला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील तब्बल ३० तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली.
रंकाळा टॉवर परिसरातील बंगाली कारागीर समीर पात्रा यांचा मुलगा सुबोधित हा व्यापाऱ्याचे दागिने पोहोचवण्यासाठी जात असताना, भेंडे गल्ली आणि गोल्ड सिल्वर पॅलेस परिसरात दोन चोरट्यांनी त्याला गाठले. त्यातील एकाने सुबोधितशी बंगाली भाषेत बोलून विश्वास संपादन केला आणि दोघांनी त्याचे लक्ष विचलित करून दागिन्यांची बॅग लंपास केली.
या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे व खळबळीचे वातावरण असून, जुना राजवाडा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेऊन संशयितांचा शोध सुरू केला आहे.