SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेमेहनत हाच यशाचा मार्ग : विनायक भोसले; संजय घोडावत विद्यापीठात नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवातआमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची खलिफा कुटुंबीयांना सांत्वनपर भेट ; जुन्या स्मृतींना उजाळा पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कारउप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत शिक्षण महर्षी आणि अजातशत्रू, थोर व्यक्तीमत्व हरपल्याची भावना केली व्यक्तगोकुळ निवडणुकीवरून प्रशासनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल!कळंब्यातील स्फोटाचे रहस्य उलगडले! दिवाणी वादातून घडवला होता जिलेटीनचा स्फोट; तीन आरोपींना अटकनिवडणूक जिंकल्यावर डी. वाय. दादा, बंटी आणि माझे अभिनंदन करायचे...; हसन मुश्रीफ यांनी जागवल्या आठवणीकोरगावकर ट्रस्टचा पर्यावरण संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम; ११ वर्षांपासून १० हजार रोपांचे मोफत वाटपआंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन: सुरक्षित प्रवासाचा पाया

जाहिरात

 

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

schedule05 Aug 26 person by visibility 354 categoryराज्य

◼️लाडक्या लोकनेत्याला अखेर निरोप देण्यासाठी जनसागर लोटला

कोल्हापूर : अनेकांना जगण्याचा बळ देणाऱ्या, अनेक कुटुबांना आधार देणाऱ्या, लाखोंचे जीवन फुलविण्याऱ्या, देशाच्या शिक्षण क्षेत्राला दिशा देणा-या शिक्षण महर्षी लोकनेता, ज्ञानतपस्वी पद्मश्री  डॉ. डी. वाय.पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला. पॅव्हेलियन मैदान येथे पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिरंग्यात लपटलेल्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाला पोलीस पथकाने बंदुकीच्या फेरी झाडून मानवंदना दिली.

कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानाहून फुलांनी सजविलेल्या वाहनामध्ये पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील  यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते.  मेडिकल कॉलेज - लाईन बाजार- भगवा चौक - कसबा बावडा- मेन रोड - श्रीराम सोसायटी रस्ता - गवत मंडई - फायर स्टेशन मार्गे त्यांची अंत्ययात्रा पॅव्हेलियन मैदान आली. यावेळी आपल्या लाडक्या लोकनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. 

याप्रसंगी विविध मान्यवर आणि प्रशासन यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात दादा पाटील, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पुढारी वृत्तपत्र समुहाचे प्रमुख पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील, आ. अंबादास दानवे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने आ. अंबादास दानवे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आ. अमित देशमुख, आ. विश्वजित कदम, सर्वश्री आमदार डॉ. विनय कोरे, चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील, प्राजक्त तनपुरे, हेमंत ओगले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार राजु शेट्टी, संजय मंडलीक, विनेदिता माने, श्रीमंत छत्रपती संभाजी राजे, माजी आमदार सर्वश्री के.पी. पाटील, राजू जयवंतराव आवळे, राजीव किसन आवळे, सत्यजित पाटील, भगवानराव साळुंखे, कोल्हापूर मनपा उपमहापौर अक्षय जरग यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदराजंली वाहिली. तर प्रशासनाच्यावतीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, इचलकरंजी महानगरपालिका महापौर उदय धातुंडे, पुढारी माध्यम समुहाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, अरुणभाई बुधवाळकर, सांगली मिरज कुपवाड मनपा विरोधी पक्षनेता मंगेश चव्हाण, उद्योजक डॉ. संजय घोडावत, पुणे महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर नवीन कोशी यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदराजंली वाहिली.

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, डॉ. विजय डी पाटील, डॉ.अजिंक्य डी पाटील, डॉ. श्री. उद्धव पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांच्यासह कुटुबांतील अन्य सन्माननीय सदस्य उपस्थित होते. आमदार जयंत आसगावकर यांच्यासह यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 


अमर रहे, अमर रहे डी.वाय दादा अमर रहे  च्या घोषणांनी वातावरण अधिकच भावूक केले. अत्यंत विद्यवान, कर्तृत्वान, अजातशत्रू व्यक्तिमत्वाला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. सर्वांचे लाडके डी. वाय दादा अर्थात पद्मश्री डी. वाय. पाटील अनंतात विलिन होत असताना लाखो उपस्थितांनी त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes