SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेमेहनत हाच यशाचा मार्ग : विनायक भोसले; संजय घोडावत विद्यापीठात नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवातआमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची खलिफा कुटुंबीयांना सांत्वनपर भेट ; जुन्या स्मृतींना उजाळा पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कारउप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत शिक्षण महर्षी आणि अजातशत्रू, थोर व्यक्तीमत्व हरपल्याची भावना केली व्यक्तगोकुळ निवडणुकीवरून प्रशासनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल!कळंब्यातील स्फोटाचे रहस्य उलगडले! दिवाणी वादातून घडवला होता जिलेटीनचा स्फोट; तीन आरोपींना अटकनिवडणूक जिंकल्यावर डी. वाय. दादा, बंटी आणि माझे अभिनंदन करायचे...; हसन मुश्रीफ यांनी जागवल्या आठवणीकोरगावकर ट्रस्टचा पर्यावरण संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम; ११ वर्षांपासून १० हजार रोपांचे मोफत वाटपआंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन: सुरक्षित प्रवासाचा पाया

जाहिरात

 

आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची खलिफा कुटुंबीयांना सांत्वनपर भेट ; जुन्या स्मृतींना उजाळा

schedule05 Aug 26 person by visibility 128 categoryसामाजिक

यड्राव  : ज्येष्ठ समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आणि यड्रावकर गटाचे ज्येष्ठ सहकारी रमजानचाचा (रहेमानचाचा) खलिफा यांच्या पत्नी स्व. लालबी रमजानचाचा खलिफा यांच्या आकस्मिक निधनानंतर शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हत्ती चौक येथील खलिफा कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन  कुटुंबीयांचे सांत्वन केले.

 स्व. शामराव (आण्णा) पाटील-यड्रावकर आणि रमजानचाचा खलिफा यांच्यातील जिव्हाळ्याच्या मैत्रीच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
रमजानचाचा खलिफा हे यड्राव सन १९५७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळापासून स्व. शामराव अण्णा पाटील-यड्रावकर यांच्यापासून आजपर्यंत लवकर गटाशी ती एकनिष्ठ राहिले आहेत. तसेच प्रत्येक राजकीय आणि सामाजिक वाटचालीत त्यांनी यड्रावकर गटाला साथ दिली आहे. त्यामुळे यड्रावकर कुटुंब आणि खलिफा कुटुंब यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध आजही कायम असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

 इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन आणि इचलकरंजी अर्बन बँक या महत्त्वाच्या संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.

स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर त्यांच्याबरोबर काम केलेल्या कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचा संबंध ठेवण्याचे काम आजही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.
या सांत्वन भेटीदरम्यान शौकत खलिफा, मुसा खलिफा, प्रकाश अकिवाटे, संकेत बरगाले, संजय नांदणे यांच्यासह खलिफा कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, आप्तस्वकीय आणि यड्रावकर गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes