SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर- मुंबई मार्गावर मिळणार विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यशकर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्यारूपाने वैयक्तिक मित्र गमावला क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूरचा गौरवनगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचाआयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावाभाजपा महिला, युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेधनाविन्याचा शोध घ्या : डॉ. रत्नाकर पंडित; ग. गो. जाधव अध्यासनात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहातशिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा उत्साहात कोल्हापुरात १५ मार्च रोजी 'विधी सेवा महाशिबिर'; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला तयारीचा आढावाए.एन.एम. प्रथम वर्ष शपथविधी समारंभ उत्साहात येत्या गुरुवारी 'इग्नाईट महाराष्ट्र' एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जाहिरात

 

भजन , कीर्तन राज्याच्या संस्कृतीचा कणा : मंत्री आशिष शेलार; " चढता सुरज धीरे धीरे " या कव्वालीने महोत्सवास प्रारंभ

schedule21 Feb 26 person by visibility 251 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्राला संतांची गौरवशाली परंपरा आहे .संत परंपरेतील भजन - कीर्तन या बाबी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्रमुख कणा असून त्याचा वारसा जपणे हेच शासनाचे ध्येय आहे असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केले .

    राज्याच्या सांस्कृतिक कार्यसंचानालयच्या वतीने डॉ.व्ही.टी पाटील स्मृतीभवन (राजारामपुरी) येथे 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान कव्वाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे ,महेश जाधव ,सांस्कृतिक विभागाचे अवर सचिव बाळासाहेब सावंत ,कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ आदी उपस्थित होते.

  कव्वाली हा प्रकारही संगीताची एक प्रकारे साधनाच आहे.राज्यात कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी सुमारे बाराशेहुन अधिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक आर्थिक वर्षात 1800 भजनी मंडळांना प्रत्येकी 25 हजार रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णयही सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागामार्फत घेण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

        याप्रसंगी विठू माऊली सप्तशृंगीसईम देव या तीन महिला भजनी मंडळ तर दत्त ,डाक्रोबा पायराई आणि दत्त प्रसादिक यापुरुष भजनी मंडळाला रुपये 25 हजार रुपयांच धनादेश देऊन मंत्री शेलार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या कवाली महोत्सवात राज्यातील विविध कलाकारांचे कव्वाली गायन होणार आहे .आयुष्याचे सार सांगणाऱ्या, " चढता सुरज धीरे धीरे " या कव्वालीने या महोत्सवाला प्रारंभ झाला.यावेळी प्रसिद्ध कव्वाल हाजी सुलतान नाजा (मुंबई ) व कव्वाल तौहिद अली (पुणे) यांचा सत्कार  शेलार यांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes