SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

पाकिस्तानी सैन्यावर हल्ला; ९० जवान ठार; बीएलएने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

schedule16 Mar 25 person by visibility 1268 categoryविदेश

इस्लामाबाद : बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य दलावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल ९० पाकिस्तानी सैन्याचे जवान ठार झाले आहेत, असा दावा बीएलएकडून करण्यात आला आहे. बीएलए या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पाकिस्तान आणि बीएलए यांच्यातील रणसंग्राम अधिक तीव्र झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, बीएलएने पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेस हायजॅक केल्यानंतर पाकिस्तानी आर्मीने ऑपरेशन रावबून बलूच आर्मीतील ३० जवानांना ठार करत ट्रेनमधील ओलीस ठेवलेल्या प्रवाशांची सुटका केली होती. त्यानंतर, बलूच आर्मीने प्रत्युत्तर देत पाकिस्तानी कॅम्पवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात बस जळून खाक झाली असून बसमधील ९० जवान ठार झाले. 

 आरसीडी हायवेवर पाकिस्तानी सैन्य दलाच्या तुकडीवर बलूच आर्मीकडून हा हल्ला करण्यात आल्याची स्थानिक सूत्रांची माहिती आहे. येथे सुरुवातीला काही स्फोट झाले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबाराची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेतली  आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes