SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात वनविभागाचा मोठा दणका! फुलेवाडीत दुर्मिळ 'डेव्हिल रे' माशाची विक्री करणाऱ्यावर कारवाईअंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक : महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेतरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटीलनैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्वाचे : उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांचे प्रतिपादन; कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण संपन्न कोल्हापूर : नगररचना विभागामार्फत एक दिवसाचा विशेष कॅम्पकोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयातील आर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर व जनरल ऑपरेशन थिएटर पाच दिवस बंदनवीन कृषी पंपाना कनेक्शन, कमी दरात वीज, वीज दरवाढ रद्द करुन प्रस्ताव मागे घेण्याबाबत आमदार सतेज पाटील यांचे विधानपरिषदेत प्रश्नकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा ३३ वा हंगाम समाप्त"व्यवसायाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उद्योगशिक्षण या क्षेत्रांचा सुसंवाद आवश्यक"ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - डॉ.राजन गवस

जाहिरात

 

कोल्हापुरात वनविभागाचा मोठा दणका! फुलेवाडीत दुर्मिळ 'डेव्हिल रे' माशाची विक्री करणाऱ्यावर कारवाई

schedule26 Feb 26 person by visibility 133 categoryगुन्हे

कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुलेवाडी परिसरात वन्यजीव तस्करी आणि बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरुद्ध वनविभागाने सर्जिकल स्ट्राईक केला आहे. फुलेवाडी रिंग रोडवरील 'फ्रेंडशिप फिश कंपनी' येथे अनुसूचित-I मधील अत्यंत दुर्मिळ आणि संरक्षित असलेला 'शॉर्टफिन डेव्हिल रे' (Shortfin Devil Ray) हा मासा विक्रीसाठी ठेवल्याची गुप्त माहिती मिळताच वनविभागाने छापा टाकून तो जप्त केला.

दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून, करवीर वनपरिक्षेत्राच्या पथकाने ही धडक कारवाई केली. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार, हा मासा अत्यंत संरक्षित श्रेणीत येतो. याप्रकरणी सुनील विनोद सातपुते (राहणार येडेमच्छींद्र, ता. वाळवा, जि. सांगली) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

उपवनसंरक्षक  धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक  विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी  नंदकुमार नलवडे व त्यांच्या टीमने ही धाडसी कारवाई पूर्ण केली. या कारवाईत वनपाल सागर कोळी, वनरक्षक ओंकार भोसले, विकास घोलप आणि इतर कर्मचाऱ्यांसह मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी यांचा सहभाग होता.


कोल्हापुरात अशा प्रकारे दुर्मिळ सागरी जीवांची तस्करी उघड झाल्याने खळबळ उडाली असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes