SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक : महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेतरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटीलनैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्वाचे : उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांचे प्रतिपादन; कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण संपन्न कोल्हापूर : नगररचना विभागामार्फत एक दिवसाचा विशेष कॅम्पकोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयातील आर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर व जनरल ऑपरेशन थिएटर पाच दिवस बंदनवीन कृषी पंपाना कनेक्शन, कमी दरात वीज, वीज दरवाढ रद्द करुन प्रस्ताव मागे घेण्याबाबत आमदार सतेज पाटील यांचे विधानपरिषदेत प्रश्नकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा ३३ वा हंगाम समाप्त"व्यवसायाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उद्योगशिक्षण या क्षेत्रांचा सुसंवाद आवश्यक"ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - डॉ.राजन गवसडॉ.म.सु.पाटील वैश्विक दृष्टिकोन अंगीकारलेले समीक्षक : प्राचार्य डॉ.दिलीप धोंगडे

जाहिरात

 

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा ३३ वा हंगाम समाप्त

schedule25 Feb 26 person by visibility 194 categoryउद्योग

इचलकरंजी : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ हा ३३ वा ऊस गाळप हंगाम संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे  आणि ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे आणि संचालक आमदार  राहूल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाला. हंगाम समाप्तीप्रित्यर्थ व्हाईस चेअरमन बाबासाो चौगुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी  सन्मती चौगुले या उभयतांच्या हस्ते  सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. त्याचबरोबर हंगामात उत्पादित झालेल्या साखर पोत्यांचे पूजनही करण्यात आले.

कारखान्याच्या या गाळप हंगामामध्ये १४ लाख ८९ हजार ७२२ मे. टन इतके ऊस गाळप केले. या हंगामात कारखान्याकडे १६४२४ हेक्टर इतका ऊस गाळपासाठी आला. हंगामापूर्वीचा सततचा पाऊस व अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे ऊस पिकाच्या वजन वाढीवर दुष्परिणाम झाला. अर्थातच हवामानाच्या या प्रतिकुलतेमुळे ऊसाच्या वजनात घट झाली. त्यामुळे चालू हंगामामध्ये हेक्टरी सरासरी ९१ मे. टन इतके ऊस उत्पादन मिळाले, मागील हंगामात ते ९६ मे.टन होते.

 गाळप हंगाम २०२५-२६ करीता ऊस विकास योजनेतून खते, बि-बियाणे, तणनाशके, सुक्ष्म अन्नद्रव्ये, ठिबक सिंचन, क्षारपड जमीन सुधारणा यासाठी १६ कोटी ०८ लाख १८ हजार इतक्या रकमेचे वाटप केले. त्यामध्ये ९६ लाख ५९ हजार इतके अनुदान दिलेले आहे.

या हंगामाकरीता तोडणी वाहतूकीसाठी २ ट्रक, ३११ ट्रॅक्टर, ४५९ ट्रॅक्टर टायरगाडी व २१६ बैलगाडी आणि ६६ ऊस तोडणी यंत्रे प्रत्यक्षात कामावर हजर झाले. यामुळे हंगामात सलग ऊस पुरवठा होण्यास मदत झाली.

ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य केल्याबद्दल शेतकरी-सभासद, तोडणी वाहतूकदार व मजूर आणि अधिकारी-कर्मचारी कामगार यांचे कारखाना व्यवस्थापनाने आभार मानले. पुढील हंगामामध्ये या वर्षापेक्षाहि अधिक ऊस गाळप होण्यासाठी सर्व सभासद व शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस नोंद देऊन गाळपासाठी पाठवावा असे आवाहनही संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक, कामगार युनियनचे प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर व कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes