SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक : महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेतरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटीलनैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्वाचे : उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांचे प्रतिपादन; कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण संपन्न कोल्हापूर : नगररचना विभागामार्फत एक दिवसाचा विशेष कॅम्पकोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयातील आर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर व जनरल ऑपरेशन थिएटर पाच दिवस बंदनवीन कृषी पंपाना कनेक्शन, कमी दरात वीज, वीज दरवाढ रद्द करुन प्रस्ताव मागे घेण्याबाबत आमदार सतेज पाटील यांचे विधानपरिषदेत प्रश्नकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा ३३ वा हंगाम समाप्त"व्यवसायाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उद्योगशिक्षण या क्षेत्रांचा सुसंवाद आवश्यक"ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - डॉ.राजन गवसडॉ.म.सु.पाटील वैश्विक दृष्टिकोन अंगीकारलेले समीक्षक : प्राचार्य डॉ.दिलीप धोंगडे

जाहिरात

 

नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्वाचे : उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांचे प्रतिपादन; कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण संपन्न

schedule25 Feb 26 person by visibility 169 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन व पर्यावरणपूरक शेतीची संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत महिलांसाठी नैसर्गिक शेतीवरील पाच दिवसीय  ‘सखी प्रशिक्षण कार्यक्रमा’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

  भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली संलग्न डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान  राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत ‘सखी प्रशिक्षण कार्यक्रम’ दिनांक १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणात कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना नैसर्गिक शेतीविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.  पोपट पाटील यांनी कृषी विभाग व आत्मामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच नैसर्गिक शेतीची आवश्यकता व महिलांचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचे फलित म्हणून  प्रशिक्षण घेतलेल्या  ६० कृषी सखी आपापल्या गावात जाऊन इतर शेतकरी महिलांना नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी 'प्रशिक्षक' म्हणून काम पाहणार आहेत.

 प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख जयवंत जगताप यांनी केले. त्यांनी केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नैसर्गिक शेती प्रयोगशाळा, उत्पादन युनिट्स, प्रात्यक्षिक शेत आणि प्रशिक्षण व्यवस्थेचे महत्व अधोरेखित केले. 

प्रशिक्षणा दरम्यान नैसर्गिक शेतीचे तत्त्वज्ञान, सिद्धांत व पारंपरिक ज्ञानाचे महत्त्व, बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत तयार करण्याची प्रक्रिया व फायदे, सेंद्रिय खत व्यवस्थापन, वर्मी कंपोस्टिंग व खतांचे साठवण व वापर, कीड नियंत्रणासाठी नैसर्गिक उपाय, आंतरपिक व मिश्रपीक पद्धती, महिलांसाठी पूरक व्यवसाय, मूल्यवर्धन प्रक्रिया याबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात आले.  प्रत्येक दिवशी विषयतज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सत्रांद्वारे व्याख्याने, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, चर्चा व गट कार्यशाळा संपन्न झाल्या. 

या  कार्यक्रमात हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी व भुदरगड तालुक्यांतील  ६० कृषी सखी प्रतिनिधी संख्येने उपस्थित होत्या.  या कार्यक्रमासाठी आत्मा कोल्हापूरचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे, उपसंचालक श्री रवींद्र तागड, तसेच पन्हाळा बीटीएम श्री आर. एस. चौगुले, हातकणंगले बीटीएम श्री. संदीप देसाई, पन्हाळा एटीएम विश्वजीत पाटील,  शाहूवाडी एटीएम सचिन कांबळे, हातकणंगले एटीएम वसीम मुल्ला, शिरोळ एटीएम कीर्तीकुमार पाटील यांचे सहकार्य लाभले. 

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विस्तार विशेषज्ञ राजवर्धन सावंत भोसले व आभार श्री दीपक पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes