SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशाराकोल्हापूरच्या अक्षय मानेचा बँकॉक हायरॉक्स स्पर्धेत डंका; आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा!प्रतिसरकारचे शोषणमुक्त समाजाचे स्वप्न ‘जेन-झी’ने साकारावे: डॉ. भारत पाटणकरडी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदेच्या २७१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

जाहिरात

 

ऑर्केस्ट्रा कलाकारांच्या संघर्षावर प्रकाश टाकणारे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे: कुलगुरू प्रा. डॉ. आर. के. कामत

schedule14 Aug 26 person by visibility 185 categoryसामाजिक

कोल्हापूर: "ऑर्केस्ट्रा किंवा वाद्यवृंद कलाकारांच्या आयुष्यावरील पुस्तक हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे," असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. आर. के. कामत यांनी केले. ते 'मेलोडी अँड चॅलेंजेस ऑफ ऑर्केस्ट्रा प्लेयर्स इन कोल्हापूर' या डॉ. दीपक भोसले आणि विकास अवघडे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

खरं तर ऑर्केस्ट्रा कलाकार सर्वसामान्यांच्या विविध प्रसंगांमध्ये संगीताची मेजवानी देऊन आपली भूमिका सातत्यपूर्वक बजावत असतात. परंतु, दुर्दैवाने त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा कायमस्वरूपी पाहायला मिळतो. याच धाग्याला पकडून समाजकार्य विषयातील संशोधक विकास अवघडे व मार्गदर्शक डॉ. दीपक भोसले यांच्या प्रयत्नातून या ऑर्केस्ट्रा प्लेयर्सच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक साकारले आहे.
या पुस्तकात केवळ समस्यांची मांडणी करण्यात आलेली नसून, त्यावर उपायात्मक योजना देखील खूप चांगल्या रीतीने मांडल्या आहेत. या सूचना जर येणाऱ्या काळात अमलात आल्या, तर काही अंशी या लोकांचे दुःख कमी होण्यास मदत होईल, असे सांगत कुलगुरू प्रा. डॉ. आर. कामत यांनी अशा उपेक्षित घटकावर संशोधनपर लिखाण केल्याबद्दल लेखकांचे विशेष कौतुक केले.

या प्रसंगी पुस्तकाचे सहलेखक विकास अवघडे यांनी प्रास्ताविक सादर करताना या विषयाची माहिती संकलन करीत असताना आलेले आपले अनुभव संक्षिप्तरित्या मांडले. तसेच, डॉ. दीपक भोसले यांनी हे पुस्तक लिहिण्यामागील मूळ उद्देश स्पष्ट केला. अशा प्रकारचे संशोधन केवळ ग्रंथालयापुरतं मर्यादित न राहता ते पुस्तकाच्या स्वरूपात समाजात येणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजाचा या घटकांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या प्रकाशन कार्यक्रमास ॲड. डॉ. अश्विनी बाटे, पीएचडी संशोधक माधुरी भाले आणि ‘सायबर’चे प्रशासकीय अधिकारी डॉ. विनायक साळोखे उपस्थित होते.
या पुस्तक निर्मितीसाठी कोल्हापुरातील ऑर्केस्ट्रा परिवारातील रवी सुतार, कुमार घोरपडे, राजू गोरड, मुकुंद सुतार, अमोल बुचडे, माधुरी बिरांजे, किशोर कुमार भारती, हिंदुराव अवघडे आणि संजय परब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच ‘सायबर’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. ए. शिंदे, सचिव सी. ए. ऋषिकेश शिंदे आणि संचालक डॉ. आर. के. टेलर यांचे प्रोत्साहन मिळाले.
सामाजिक समस्येवर आधारित असलेले हे पुस्तक कलकत्ता येथील 'एशियन पब्लिशिंग हाऊस'तर्फे अत्यंत माफक किमतीमध्ये वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes