SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : राजारामपुरी व स्टेशन रोड परिसरातील अनधिकृत हातगाड्या, शेड व स्टँड बोर्ड जप्तबदल स्विकारुन माध्यमांचे महत्व वृध्दिंगत करुया…!; कोल्हापूरच्या पत्रकार कार्यशाळेतील सूरकोल्हापुरात सार्वजनिक ठिकाणी आढळणारी तीन जनावरे जप्तकेशवराव भोसले नाट्यगृह पुर्नबांधणी कामाची नुतन अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची पाहणीडॉ. जब्बार पटेल यांचा उद्या विद्यापीठात मुक्त संवादपन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदचे 'सुपर स्वच्छ लीग' मध्ये देशपातळीवर यश; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवसहकार मजबुतीकरणासाठी गोकुळला सर्वतोपरी सहकार्य : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळडी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या ४२ विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवडखडकी येथे 4 ऑगस्टपासून अग्निवीर भरतीकेआयटीच्या माध्यमातून किमान ६०० विद्यार्थ्यांना नोकरीची संधी; दर्जेदार शिक्षण ,प्लेसमेंट सोबतच विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेलाही मोठे प्राधान्य

जाहिरात

 

डी के टी ई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकच्या ४ विद्यार्थ्यांची ब्रुकहार्ट कम्प्रेशन इंडिया प्रा. लि. पुणे या कंपनीत निवड

schedule03 May 25 person by visibility 416 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : येथील डी के टी ई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकच्या कॅम्पस मधुन ४ विद्यार्थ्यांची ब्रुकहार्ट कम्प्रेशन इंडिया प्रा. लि. पुणे या कंपनीत वार्षिक ३.५ लाख पॅकेजवर निवड झाली  आहे.

या कॅम्पस मध्ये पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींग मधील आकाश पाटील, सत्वेश आवळे, स्नेहल मोरे, साक्षी जाधव यांची  वार्षिक ३.७५ लाख रुपये पॅकेजवर निवड झाली आहे.

 ब्रुकहार्ट कम्प्रेशन इंडिया प्रा. लि., पुणे ही मल्टिनॅशनल कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः नैसर्गिक वायू, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन अशा विविध गॅसचे कम्प्रेशन करण्यासाठी आवश्यक असलेली उच्च दर्जाची उपकरणे बनवते. येथे संशोधन, डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसिंग यासंबंधी काम केले जाते. ही कंपनी जागतिक बाजारपेठेत आपली मजबूत उपस्थिती ठेवते आणि गुणवत्ता, सुरक्षा व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते .

  ब्रुकहार्ट कम्प्रेशन इंडिया प्रा. लि. कंपनीतर्फे नुकताच कॅम्पस इंटरव्यूव आयोजित केला होता. त्यामधून कॅम्पस इंटरव्यूव प्रोसेस मध्ये टेक्निकल राऊंड एप्टीट्यूड टेस्ट तसेच पर्सनल एचआर इंटरव्यूव इत्यादी फेऱ्या घेण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड झाली.

  डी के टी ई मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे सॉफ्टस्कील प्रोग्रामस, देण्यात येणारे इंडस्ट्रीयल प्रशिक्षण, इंडस्ट्री भेटी, गेस्ट लेक्चर्स या सर्वांचा फायदा या विद्यार्थ्यांना होत असतो.

  संस्थेच्या उच्च दर्जाच्या तांत्रिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या कंपनीत निवड होत आहे. ही डी के टी ई संस्थेसाठी  अभिमानाची बाब असल्याचे मनोगत मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी व्यक्त केले.संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व संचालकांचे सहकार्य लाभले.

    सदरच्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. ए. पी. कोथळी, डी के टी ई च्या कार्यकारी संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे,  उप प्राचार्य प्रा. बी. ए. टारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एम. बी. चौगुले, विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes