दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा ऋषिकेश कबनूरकरची दुसऱ्या क्रमांकची आघाडी
schedule27 Aug 25 person by visibility 332 categoryक्रीडा

कोल्हापूर : न्यु दिल्ली हॉटेल आपणंट बाय उदम चंद्रपूर न्यू दिल्ली येथे 24ते 28 चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या क्लासिकल रेटींग स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरने दुसऱ्या बोर्डवर रामजी मिस्त्रा उत्तरप्रदेश याच्यावर विजय मिळवत साडे सहा गुण स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर खेळत आहे आय एम कस्तूब गुंडू पश्चिम बंगाल हा 7 गुण मिळवून प्रथम स्थानावर आहे स्पर्धलादोन्ही खेळाडूने प्रत्येक फेरीला एक तास 30 मिनिट अधिक 30 सेकंड अशी घड्याळ वेळ आहे
आंतरराष्ट्रीय खुल्या क्लासिकल बुद्धिबळ रेटींग स्पर्धेत दोन आय एम, 318 आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित सह 392 खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेला एकूण 1300000 रुपये पारितोषिक आहेत स्पर्धेच्या अजून दोन फेऱ्या बाकी आहेत.
ऋषिकेश हा अनुज अकॅडमी, दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क येथे सराव करतो. तो स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन माजी सेक्रेटरी कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.