बुद्धिबळ स्पर्धेत अनुज् चेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश
schedule19 Aug 25 person by visibility 328 categoryक्रीडा

कोल्हापूर : रूई येथे 17 ऑगस्ट रोजी झालेल्या एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अनुज् चेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळवले.
यामध्ये ओम कागवाडे (इयत्ता 8 वी पाचवा क्रमांक), अभिनंदन पाटील (इयत्ता 8 वी तिसरा क्रमांक), श्रीनय पालनकर ( इयत्ता 1 ली 7 वा क्रमांक), फजल मुजावर (इयत्ता 8 वी 9 वा क्रमांक) (हॉलिडेन इंग्लिश मिडीयम स्कूल, कागल).
शिवराज कामते (इयत्ता UKG तृतीय क्रमांक), शिवतेज कामते (इयत्ता 4 थी 6 वा क्रमांक), आयुष कदम (इयत्ता 7 वी 9 वा क्रमांक). (डी वाय पाटील विद्यानिकेतन स्कूल, साळोखेनगर) विवान क्षीरसागर (इयत्ता 6 वी 8 वा क्रमांक) ( माने इंटरनॅशनल अकॅडमी, कागल)
अद्विक विचारे (इयत्ता 7 वी चौथा क्रमांक) (सौ शिलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल, तपोवन)
सर्वांना बुद्धिबळ प्रशिक्षक बाबूराव पाटील व राष्ट्रीय खेळाडू तसेच बुद्धिबळ प्रशिक्षक अनुष्का पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.