मुंबई क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनूरकरचा चतुर्थ क्रमांक
schedule22 Aug 25 person by visibility 106 categoryक्रीडा

कोल्हापूर : मुंबई येथे झालेल्या मास्टर्स क्लासिकल रेटींग स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकर याने ६.५ गुण 8 फेरीत याने मिळवून खुल्यागटात १५,०००रु बक्षिसासह चौथा क्रमांक मिळवला. मुंबई येथे रशियन बुद्धिबळ केंद्र येथे या स्पर्धा 16 ते 21 ऑगस्ट दरम्यान पार पडल्या.
स्पर्धेत पहिल्या पटावर विक्रमादित्य कुलकर्णी विरुद्ध अरविंद अय्यर यांनी सामना बरोबरी करून अरविंद यांनी विजेतेपद मिळवले त्याला रोख 50,000 आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. ऋषिकेश कबनूरकरने तिसऱ्या बोर्डवर ए एफ एम साहिल चोगले याच्यावर विजय मिळवत साडेसहा गुण कमाई करत स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक मिळवला रोख 15,000 रुपये आणि त्याला सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत दोन्ही खेळाडूने प्रत्येक फेरीला एक तास 30 मिनिट अधिक 30 सेकंड अशी घड्याळ वेळ घेतली.
मास्टर्स क्लासिकल रेटींग स्पर्धेत दोन आय एम, 73 आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित सह 142 खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेला एकूण 400000 रुपये पारितोषिक होती
ऋषिकेश हा अनुज अकॅडमी, दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क येथे सराव करतो. तो स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन माजी सेक्रेटरी कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.