'मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा' स्पर्धेत राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र ११ ला तालुका स्तरावर प्रथम क्रमांक
schedule25 Aug 25 person by visibility 264 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानाच्या टप्पा क्र. २ मध्ये प्राथमिक शिक्षण समितीचे राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र ११ , कसबा बावडा या शाळेने यश मिळवले. मनपा व्यवस्थापन शाळा गट, " केंद्रस्तर या गटात " या शाळेने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत करवीर पंचायत समिती व प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगर पालिका 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानाच्या टप्पा क्र.२चा तालुका स्तरीय गुणगौरव सोहळा जिल्हा परिषद सभागृहात संपन्न झाला.
मनपा व्यवस्थापन शाळा गट, केंद्र स्तर गटात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. करवीर पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सौ. अर्चना पाथरे आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार यांच्या हस्ते व शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, बाळासाहेब कांबळे, चंद्रकांत कुंभार, विषय तज्ञ श्रावण कोकितकर व इतर मान्यवरांच्या हस्ते केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील, उपमुख्याध्यापक उत्तम कुंभार व इतर शिक्षक वृंद सहकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच सदस्य यांनी मिळवलेल्या या उत्कृष्ट यशाबद्दल अभिनंदन केले.