कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप; पंचगंगेच्या पाणी पातळीत घट
schedule23 Aug 25 person by visibility 221 categoryराजकीय

▪️जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 3.2 मिमी पाऊस
▪️गनबावडा तालुक्यात सर्वाधिक 23.5 मिमी पावसाची नोंद
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 3.2 मिमी पाऊस झाला असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 23.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नैसर्गिक आपत्ती विषयी जिल्हा प्रशासनाकडून दैनंदिन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून 22 ऑगस्ट 2025 रोजीच्या सकाळी 10 वाजेपर्यंतचा अहवाल पुढील प्रमाणे आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 1.1 मिमी, शिरोळ - 0.2 मिमी, पन्हाळा- 4.8 मिमी, शाहुवाडी- 5.3 मिमी, राधानगरी- 4.9 मिमी, गगनबावडा- 23.5 मिमी, करवीर- 2.7 मिमी, कागल- 1 मिमी, गडहिंग्लज- 1.5 मिमी, भुदरगड- 2.2 मिमी, आजरा- 3.5 मिमी, चंदगड- 2.8 मिमी असा एकूण 3.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
वाहतूक स्थिती: रस्ते वाहतुकीबाबत अहवालानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सुरु आहेत. राज्यमार्ग 6 बंद झाले आहेत. प्रमुख जिल्हा मार्ग 21 बंद, इतर जिल्हा मार्ग 11 आणि ग्रामीण मार्ग 30 असे एकूण 41 रस्ते बंधाऱ्यावर, रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद आहेत. बंद असलेल्या मार्गासाठी पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरु आहे.
पावसामुळे नुकसान झाल्याचा तपशिल -
पूर्णत: पडलेली घरे- पक्की घरे व कच्ची घरे- 22 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या – 00, 22 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 04
अंशत: पडलेली घरे- पक्की घरे- 22 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या – 00, 22 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 04
कच्ची घरे- 22 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 40, 22 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 1003
पडझड झालेल्या झोपडपट्ट्यांची संख्या- 22 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 00, 22 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 00
बाधित गोठ्यांची संख्या – 22 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 02, 22 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 71
जिवीत हानी/ मृत व्यक्ती- 22 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 01, 22 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 05
मृत दुधाळ जनावरे-
मोठी जनावरे- 22 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 00, 22 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 07
लहान जनावरे- 22 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 00, 22 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 00
मृत ओढकाम करणारी जनावरे-
मोठी जनावरे- 22 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 00, 22 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 00
लहान जनावरे- 22 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 00, 22 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 04
सार्वजनिक/ खासगी मालमत्तांचे नुकसान-
सार्वजनिक मालमत्ता- 22 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 00, 22 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 06
खासगी मालमत्ता- 22 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 40, 22 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 1073
अतिवृष्टीमुळे तात्पुरत्या स्वरुपात निराधार झालेल्या व्यक्ती- एकूण कुटूंब 22 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 00, 22 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 102
बाधित व्यक्ती- एकूण कुटूंब 22 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 00, 22 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 432
आज रोजीची स्थलांतरीत कुटूंब संख्या-
शिरोळ तालुका- कुरंदवाड- कुटूंब संख्या- 209, पुरुष 400, स्त्री 376, लहान मुले 59, एकूण 835, जनावरे 34
असे एकूण- कुटूंब संख्या- 209, पुरुष 400, स्त्री 376, लहान मुले 59, एकूण 835, जनावरे 34
इचलकरंजी महानगरपालिका- कुटूंब संख्या- 30, पुरुष 38, स्त्री 49, लहान मुले 9, एकूण 96, जनावरे 64
असे एकूण- कुटूंब संख्या- 30, पुरुष 38, स्त्री 49, लहान मुले 9, एकूण 96, जनावरे 64
कागल तालुका- सिद्धनेर्ली - कुटूंब संख्या- 04, पुरुष 05, स्त्री 06, लहान मुले 04, एकूण 15, जनावरे 05
असे एकूण- कुटूंब संख्या- 04, पुरुष 05, स्त्री 06, लहान मुले 04, एकूण 15, जनावरे 05
हातकणंगले तालुका- शिरोली पु.- कुटूंब संख्या- 3, पुरुष 5, स्त्री 5, लहान मुले 4, एकूण 14, जनावरे 22
धुणकी- कुटूंब संख्या- 6, पुरुष 0, स्त्री 0, लहान मुले 0, एकूण 10, जनावरे 19
खोची- कुटूंब संख्या- 4, पुरुष 7, स्त्री 7, लहान मुले 7, एकूण 21, जनावरे 13
खोची- कुटूंब संख्या- 10, पुरुष 0, स्त्री 0 लहान मुले 0, एकूण 0, जनावरे 55
असे एकूण- कुटूंब संख्या- 23, पुरुष 12, स्त्री 12, लहान मुले 11, एकूण 35, जनावरे 109
कोल्हापूर महानगरपालिका - कुटूंब संख्या- 12, पुरुष 18, स्त्री 15, लहान मुले 18, एकूण 51, जनावरे 00
असे एकूण- कुटूंब संख्या- 12, पुरुष 18, स्त्री 15, लहान मुले 18, एकूण 51, जनावरे 00
दिनांक 23 ऑगस्ट 2025
कागल तालुका- सुळकूड- कुटूंब संख्या- 13, पुरुष 23, स्त्री 14, लहान मुले 4, एकूण 41, जनावरे 26
क.सांगाव- कुटूंब संख्या- 02, पुरुष 07, स्त्री 02, लहान मुले 00, एकूण 09, जनावरे 00
बाचणी- कुटूंब संख्या- 05, पुरुष 06, स्त्री 05, लहान मुले 04, एकूण 15, जनावरे 25
असे एकूण- कुटूंब संख्या- 20, पुरुष 36, स्त्री 21, लहान मुले 08, एकूण 65, जनावरे 51
नैसर्गिक आपत्ती अहवाल दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यामधील नदी पातळी, धरण, वाहतूक व नुकसानीची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे.
नदी पातळी (पंचगंगा नदी): पंचगंगा नदीची पातळी (सकाळी 10 वाजेपर्यंत) खालीलप्रमाणे आहे:
राजाराम बंधारा: पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी 40.04 फूट होती. (इशारा पातळी 39 फूट, धोका पातळी 43 फूट).
शिरोळ बंधारा: सद्याची पातळी 63.06 फूट (इशारा पातळी 74 फूट, धोका पातळी 78 फूट).
नृसिंहवाडी: सद्याची पातळी 61.06 फूट (इशारा पातळी 65 फूट, धोका पातळी 68 फूट).
सुर्वे : सद्याची पातळी 38.02 फूट (इशारा पातळी 48 फूट, धोका पातळी 50 फूट).
रुई : सद्याची पातळी 71.04 फूट (इशारा पातळी 67 फूट, धोका पातळी 70 फूट).
इचलकरंजी : सद्याची पातळी 68.08 फूट (इशारा पातळी 68 फूट, धोका पातळी 71 फूट).
तेरवाड: सद्याची पातळी 65.01 फूट (इशारा पातळी 71 फूट, धोका पातळी 73 फूट).
तसेच आज दुपारी 2 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी 39.10 फूट आहे. (इशारा पातळी 39 फूट, धोका पातळी 43 फूट).
धरण स्थिती: जिल्ह्यातील प्रमुख धरणांची स्थिती (23 ऑगस्ट 2025 रोजी) खालीलप्रमाणे आहे:
राधानगरी धरण: एकूण क्षमता 8.36 टीएमसी, आजचा साठा 8.26 टीएमसी, टक्केवारी 99.00, विसर्ग 1500
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद आहेत.
तुळशी धरण: एकूण क्षमता 3.47 टीएमसी, आजचा साठा 3.41 टीएमसी, टक्केवारी 98.00, विसर्ग 300
वारणा धरण: एकूण क्षमता 34.39 टीएमसी, आजचा साठा 31.92 टीएमसी, टक्केवारी 93.00, विसर्ग 1630
दूधगंगा धरण: एकूण क्षमता 25.39 टीएमसी, आजचा साठा 21.39 टीएमसी, टक्केवारी 84.00, विसर्ग 6100
कासारी : एकूण क्षमता 2.77 टीएमसी, आजचा साठा 2.62 टीएमसी, टक्केवारी 94.00, विसर्ग 800
कडवी : एकूण क्षमता 2.52 टीएमसी, आजचा साठा 2.52 टीएमसी, टक्केवारी 100.00, विसर्ग 452
कुंभी : एकूण क्षमता 2.71 टीएमसी, आजचा साठा 2.60 टीएमसी, टक्केवारी 96.00, विसर्ग 300
पाटगाव : एकूण क्षमता 3.71 टीएमसी, आजचा साठा 3.72 टीएमसी, टक्केवारी 100.00, विसर्ग 540
चिकोत्रा : एकूण क्षमता 1.52 टीएमसी, आजचा साठा 1.52 टीएमसी, टक्केवारी 100.00, विसर्ग 100
चित्री: एकूण क्षमता 1.88 टीएमसी, आजचा साठा 1.89 टीएमसी, टक्केवारी 100.00, विसर्ग 531
जंगमहट्टी: एकूण क्षमता 1.22 टीएमसी, आजचा साठा 1.22 टीएमसी, टक्केवारी 100.00, विसर्ग 335
घटप्रभा : एकूण क्षमता 1.56 टीएमसी, आजचा साठा 1.56 टीएमसी, टक्केवारी 100.00, विसर्ग 972
जांबरे : एकूण क्षमता 0.82 टीएमसी, आजचा साठा 0.82 टीएमसी, टक्केवारी 100.00, विसर्ग 240
आंबेओहोळ : एकूण क्षमता 1.24 टीएमसी, आजचा साठा 1.24 टीएमसी, टक्केवारी 100.00, विसर्ग 259
कोयना : पाणी पातळी मी.- 658.114, टीएमसी- 99.63, आवक- 21365, जावक- 2100, टक्के- 94.66
अलमट्टी: पाणी पातळी मी.-517.94, टीएमसी- 96.832, आवक-245562, जावक- 250000, टक्के- 78.70
हिपरग्गी : पाणी पातळी मी.- 525.24, टीएमसी- 00, आवक- 264230, जावक- 263480, टक्के- 00
नैसर्गिक दैनंदिन आपत्ती अहवालाबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.