तात्यासाहेब कोरे डिप्लोमा अभियांत्रिकी येथे पायथॉन प्रोग्रामिंग कार्यशाळा उत्साहात
schedule27 Aug 25 person by visibility 277 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (डिप्लोमा), वारणानगर येथील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभाग यांच्या वतीने दिनांक २२, २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी तीन दिवसीय " पायथॉन प्रोग्रामिंग " कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी प्रमुख तज्ञ म्हणून सौ. अरुणा चव्हाण (फाऊंडर अँड सिनियर इन्स्ट्रक्टर, एक्सेल कम्प्युटर्स , कोल्हापूर ), यांनी प्रशिक्षण दिले. कार्यशाळेसाठी वारणा विभाग शिक्षण मंडळांचे अध्यक्ष माननीय आमदार डॉ. विनयरावजी कोरे(सावकर साहेब) व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी यांनी प्रोत्साहन दिले.तसेच संस्थेचे प्राचार्य प्रा . पी. आर. पाटील व सल्लागार डॉ .पी.एम. पाटील यांचे सहकार्य लाभले.
या तीन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये पायथॉन या आधुनिक व लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषेवरील प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये कोर पायथॉन, डेटा स्ट्रक्चर्स, अॅरे, ऊप्स कॉन्सेप्ट यावर प्रोग्रामिंग केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आयडीएलई , व्हीएस कोड, ज्युपिटर या सॉफ्टवेअरचा सराव करून प्रत्येक्ष अनुभव घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आणि रोजगारक्षमतेला चालना देणारी ठरली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी तसेच विषय शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. ए. व्ही. पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच प्रा. पी. व्ही. चव्हाण (एचओडी, मेकॅनिकल विभाग), प्रा. एस. व्ही.सुर्वे (अकॅडमिक कोऑर्डिनेटर), व प्रा. डी. आर. माने (ऑफिस इन्चार्ज ) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.