प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे नेतृत्व प्रशिक्षण शिबिर उत्साहात
schedule24 Aug 25 person by visibility 563 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे दि २१ ते २३ ऑगस्ट असे तीन दिवसांचे नेतृत्व प्रशिक्षण शिबिर अतिशय उत्साहात पार पडले. या शिबिरासाठी लीडर , उपलीडर व जिमखाना प्रतिनिधी अशा ९६ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या शिबिरामध्ये नेता व नेतृत्व, वर्गांची स्वच्छता , शिस्त, वर्ग सजावट, बाह्य परीक्षा, स्वच्छ सुंदर शाळा, ऑफ तासांचे नियोजन, प्रथमपचार , छोटे व मोठे खेळ, श्वेतपत्रिका ठेवणे इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटक मुख्याध्यापिका सविता पाटील यांनी उत्तम नेता बनण्यासाठी लोकशाही नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले . शिबिराची सांगता प्रमुख पाहुणे विक्रम रेपे यांच्या व्याख्यानाने झाली. रेपे यांनी सूत्रसंचालन व नियोजन करताना कोणती काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले. प्रत्येक कार्यक्रम झाल्यानंतर WWW (What went wrong) व WWR (What went right) या गोष्टींवर विचार व्हायला हवा असे सांगितले.
सांगता समारंभाचे प्रास्ताविक उमा भेंडीगिरी , सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख महेश सूर्यवंशी तसेच आभार कु. वैजयंती पाटील यांनी केले.