SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आझाद मैदानावर भगव वादळ : डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलणार नाही : मनोज जरांगे राज्य सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला : आमदार सतेज पाटील; रेखांकन बदलून कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्गकरवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यास 143.90 कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्तकोल्हापुरात दीड दिवसाच्या 389 गणेश मूर्तींचे पर्यावरण पूरक इराणीखणीमध्ये विसर्जनकळंबा व बावडा फिल्टर हाऊस येथून 31 टँकरच्या 98 फेऱ्याद्वारे विविध भागात पाणीपुरवठाविभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंजचे खासगीकरण करु नका; आमदार सतेज पाटील यांची पालकमंत्र्यांकडे विनंतीप्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घरगुती गणपतीचे केले पर्यावरण पूरक विर्सजनबालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी "मासूम"‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणीस्कूल बसमध्ये 14 सप्टेंबर पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक

जाहिरात

 

लश्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा पाकिस्तानात खात्मा

schedule18 May 25 person by visibility 485 categoryविदेश

नवी दिल्ली : लश्कर -ए- तोयबाचा कमांडर दहशतवादी सैफुल्ला खालिद याची पाकिस्तानात हत्या झाली. पाकिस्तानातील सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. भारतातील तीन हल्ल्यांमध्ये सैफुल्लाचा सहभाग होता. भारतासाठी तो मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता.

सैफुल्ला खालिद हा लश्कर-ए-तोयबाचा कमांडर होता. लश्कर-ए-तोयबाने त्याला भारतात हल्ल्यांची तयारी करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, तो अनेक वर्षे नेपाळमध्ये तळ ठोकून होता आणि तेथूनच भारतात सतत दहशतवादी हल्ले करत होता. 

भारतीय गुप्तचर संस्थांना त्याच्याबद्दल माहिती मिळताच तो नेपाळमधून पाकिस्तानात पळाला. 2006 मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर हल्ल्याचा कट, 2001 मध्ये रामपूरमधील सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ला आणि 2005 मध्ये बंगळुरूमधील हल्ला यात सैफुल्लाचा सहभाग होता.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes