डीकेटीईकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त शहीद कुटुंबीयास मदतीचा धनादेश सुपुर्त
schedule15 Aug 25 person by visibility 230 categoryमहानगरपालिका

डीकेटीईने समाजाशी बांधिलकी जपतङ्क्ष देशसेवेसाठी आपल्या बलिदानाची आहुती देणा-या महाराष्ट्रातील वीरपुत्र सुरज भारत पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करीत शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबीयास कृतज्ञतानिधी दिली.
शहीद सुरज पाटील यांच्या वीरमाता सौ. सुरेखा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. प्रा. डॉ. ए.आर.बलवान यांनी प्रास्ताविक केले.
कर्तव्याप्रती भावना ठेवून शहीद जवानांच्या कुटुबिंयाच्या दुखाःत आम्ही सहभागी आहोत व संपुर्ण देश शहीद सुरज पाटील यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे देशाच्या सीमेवर जवान कार्यरत असतात म्हणून सर्व जनता सुरक्षित असते. अशी भावना यावेळी संस्थेच्या सचिव डॉ.सौ. सपना आवाडे यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास संस्थेचे कार्यकारी संचालक रवी आवाडे, संचालिका प्रा. डॉ. एल.एस.अडमुठे, उपसंचालक डॉ.यु.जे. पाटील, प्रा.ए.व्ही. शहा, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासह हुतात्मा पाटील कुटुंबीयांचे सदस्य उपस्थित होते.