पाकिस्तानी सैन्यावर हल्ला; ९० जवान ठार; बीएलएने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
schedule16 Mar 25 person by visibility 563 categoryविदेश

इस्लामाबाद : बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य दलावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल ९० पाकिस्तानी सैन्याचे जवान ठार झाले आहेत, असा दावा बीएलएकडून करण्यात आला आहे. बीएलए या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पाकिस्तान आणि बीएलए यांच्यातील रणसंग्राम अधिक तीव्र झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, बीएलएने पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेस हायजॅक केल्यानंतर पाकिस्तानी आर्मीने ऑपरेशन रावबून बलूच आर्मीतील ३० जवानांना ठार करत ट्रेनमधील ओलीस ठेवलेल्या प्रवाशांची सुटका केली होती. त्यानंतर, बलूच आर्मीने प्रत्युत्तर देत पाकिस्तानी कॅम्पवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात बस जळून खाक झाली असून बसमधील ९० जवान ठार झाले.
आरसीडी हायवेवर पाकिस्तानी सैन्य दलाच्या तुकडीवर बलूच आर्मीकडून हा हल्ला करण्यात आल्याची स्थानिक सूत्रांची माहिती आहे. येथे सुरुवातीला काही स्फोट झाले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबाराची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.