कागलचे माजी उपनगराध्यक्ष प्रविण काळबर यांच्या वाढदिवसानिमित्त एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धा : खुल्या गटात अभिषेक पाटील विजेता तर १५ वर्षाखालील गटात प्रेम निचल विजेता
schedule03 Aug 25 person by visibility 517 categoryक्रीडा

कोल्हापूर : अनुज चेस ॲकॅडमीच्या सहकार्याने कागलचे माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसीय खुली व १५ वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होती मटकरी मंगल कार्यालय, कागल येथे या स्पर्धा झाल्या.
खुल्या गटात साडेपाच गुणांसह मिरजेच्या अभिषेक पाटील याने मुद्दसर पटेल याचा पहिल्या पटलावर पराभव करून विजेतेपद पटकावले. त्याला रोख रक्कम १० हजार आणि चषक देऊन गौरवण्यात आले. तसेच मुद्दसर पटेल याने पाच गुण मिळवून उपविजेतेपद पटकावले. त्याला सात हजार 43 रुपये व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. दुसऱ्या बोर्डावर श्रीराज भोसले आदित्य सावळकर यांचा सामना बरोबरीत सुटला. श्रीराज भोसले याने तृतीय क्रमांक मिळवला तन्मय पवार चौथा तर व्यंकटेश खाडे- पाटील यांनी पाचवा क्रमांक मिळवला.
१५ वर्षाखालील गटात कागल येथील प्रेम निचल याने पहिल्या पटावर ध्रुव माने यांचा सामना बरोबरी संपला . प्रेम निचल साडेसात गुण घेत विजेतेपद मिळवले. दुसऱ्या बोर्डवर अर्णव पाटीलने ओजस व्हनमाने याचा पराभव करत उपविजेतेपद मिळवले. तसेच रुद्र माने आदित्य कोळी आणि अर्णव कुलकर्णी यांना यांनी ही पारितोषिक मिळवले.
या स्पर्धेचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झाले . १५ वर्षाखालील गटात १०५ जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला .त्यापैकी ७ आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धक होते. खुल्या गटात १६ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू सह ४४ जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
▪️स्पर्धेचा निकाल
(खुला गट)
प्रथम क्रमांक अभिषेक पाटील,
द्वितीय क्रमांक मुद्द्सर पटेल
तृतीय क्रमांक श्रीराज भोसले
▪️महिला गट विजेते
वैष्णवी मर्दाने
श्रुतिका शिराळे
▪️इतर विजेते खालीलप्रमाणे
(१५ वर्षाखालील मुले)
१.प्रेम निचल
२.अर्णव पाटील
३.आदित्य कोळी
▪️१३ वर्षाखालील मुले
ओजस व्हनमाने
सचित मुके
प्रथमेश व्यापारी
तेजस खवाट
श्रवण ठोंबरे,
अच्युत ढवण
अथर्व ऊरुणकर
▪️१३ वर्षाखालील मुली
श्रावणी वाठारकर
▪️७ वर्षाखालील मुले
अमर निंबाळकर
श्रीनय पनालकर
शिवराज कात्रट
▪️७ वर्षाखालील मुली
जीना व्यापारी
▪️९ वर्षाखालील मुले
अमर निंबाळकर
अनुज कानडे
जय पाटील
▪️९ वर्षाखालील मुली
अनया घोलपे
निधी चौगुले
▪️११ वर्षाखालील मुले
श्रीवर्धन स्वामी
श्रेयस पाटील
ऋतुजा हेंगाडे.
वरद बाबर,
अन्वेष फल्ले,
अर्चित गाडवी
या स्पर्धेला के.डी.सी.सी.बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, मा.जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे, मा.उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर ,सचिन मटकरी आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक रविराज पिष्टे, प्रतिक नाळे, संकेत भोपळे, प्रथमेश शिंदे, व प्रतिक संकेत व सर्व मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच या स्पर्धेचे पंच म्हणून
कृष्णात पाटील, बाबूराव पाटील, शैलेश व्हनकटी, अर्चना मोरे ,सुर्यकांत चोडणकर, सम्मेद पाटील यांनी काम पाहिले.