महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सोमवारी सत्कार
schedule14 Feb 26 person by visibility 291 categoryराज्य
कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेत व विविध पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिव- शाहू आघाडी, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सदस्यांचा सत्कार सोमवारी दि १६ फेब्रुवारीला खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी ही माहिती दिली.
यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपति, सत्यजीत पाटील (आबा), ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, राजीव आवळे, ए वाय पाटील, गणपतराव पाटील शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.