भाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचा उद्या रविवारी सत्कार
schedule14 Feb 26 person by visibility 248 categoryशैक्षणिक
▪️भाजपा जिल्हा कार्यालयात होणार कार्यक्रम
कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ने घवघवीत यश संपादन केले .
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार भाजपच्या जिल्हा कार्यालयात आयोजित केला असल्याची माहिती भाजपाचे पूर्व जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील व पश्चिम जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी दिली .
कोल्हापूर जिल्हा परिषदेला भाजपचे 12 सदस्य तर पंचायत समितीला कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे 31 सदस्य निवडून आलेले आहेत .भाजपाने लढवलेल्या 41 जागांपैकी दहा जागा अगदी थोडक्या मताने पराभूत झालेले आहे .भाजपने मिळवलेले जिल्हा परिषद पंचायत समितीतील हे यश पार्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे हस्ते करण्यात येणार आहे .या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार शिवाजीराव पाटील आमदार राहुल आवाडे यांचे सह जिल्ह्यातील भाजपचे सर्व प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत .
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11/30 वाजता भाजप जिल्हा कार्यालय नागाळा पार्क कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.