SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस"भीमा कृषी प्रदर्शनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह नागरिकांची ,शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तुफान गर्दीगारगोटीत 'जिल्हा ग्रंथोत्सव २०२५' चा दिमाखात शुभारंभ; ग्रंथदिंडीने वेधले लक्षकृषी प्रदर्शन-कराओके गायन स्पर्धा : आदिती भराडे, वसिम मुजावर यांनी पटकावला प्रथम क्रमांकअतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची घोडावत विद्यापीठाला सदिच्छा भेटभिमा कृषी प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्यावतीने मोफत झुणका-भाकरी वाटपमहाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सोमवारी सत्कारदक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठ संघाचे घवघवीत यशभाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचा उद्या रविवारी सत्कारशाश्वत विकासासाठी संशोधन ही रसायनशास्त्राची सामाजिक, नैतिक जबाबदारी: डॉ. इंद्रजीत घोष; शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषद

जाहिरात

 

पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule14 Feb 26 person by visibility 116 categoryराज्य

▪️'महा पशुधन एक्स्पो’ 2026 ला मुख्यमंत्र्यांची भेट
▪️मंत्री पंकजा मुंडेंची 'पशुधन उद्योजक' योजनेची घोषणा

परळी वैजनाथ : "आमची माय आणि आमची माती हेच आमचे खरे प्रेम आहे. ज्याप्रमाणे शिवशंभूंच्या दर्शनापूर्वी नंदीला वंदन करण्याची आपली संस्कृती आहे, त्याच धर्तीवर पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करत आहोत. तंत्रज्ञानाच्या जोडणीतून हे क्षेत्र महाराष्ट्राला जागतिक स्तरावर दुग्ध उत्पादनात अग्रेसर करेल," असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

परळीतील अंबेजोगाई रस्ता लगत असलेल्या ओपळे मैदानावर पशुसंवर्धन विभाग आयोजित तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. 

शेतीला 'क्लायमेट रिस्क' मधून वाचवणार

मुख्यमंत्री म्हणाले, "हे प्रदर्शन कोरडवाहू शेतीतील हवामान जोखीम (Climate Risk) कमी करण्यासाठी उचललेले एक धोरणात्मक पाऊल आहे. पिकांचे नुकसान झाले तर पशुधन हेच शेतकऱ्यासाठी आधार म्हणून काम करते. त्यामुळेच आम्ही गाईला केवळ धार्मिक महत्त्व न देता तिचे आर्थिक योगदान लक्षात घेऊन ‘राज्यमाता’ दर्जा दिला आहे."

▪️तंत्रज्ञानाची कास: AI आणि एम्ब्रियो ट्रान्सप्लांट
दुग्ध व्यवसायातील तफावत मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, "पंजाबमध्ये गाय 10-15 लिटर दूध देते, तर आपल्याकडे 2.5 लिटर ही तफावत भरून काढण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.  पशुधन संवर्धन,  आरोग्य व अचूक निरीक्षण आणि उत्पादकता वाढविण्यासाठी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मिशन' चा वापर करण्यात येईल. एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आणि सेक्स-सॉर्टेड सीमेन तंत्रज्ञानाद्वारे उच्च दर्जाच्या कालवडींची पैदास वाढवून दुग्धोत्पादन वाढवले जाईल. यासाठी विदर्भ- मराठवाड्यात 'मदर्स डेअरी' सोबत करार देखील करण्यात आला आहे.

याप्रसंगी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार रत्नाकर गुट्टे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी  एन, आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,  जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठम कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, खासगी सचिव मंदार वैद्य, अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाठकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त, बहुसंख्येने पशुपालक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes