SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सीपीआर हॉस्पिटलचा हृदयरोग विभाग महाराष्ट्रात क्रमांक - 1; सर्वाधिक 11 TAVI यशस्वी शस्त्रक्रियाशिवाजी विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कौतुकास्पद: आनंदराव पाटील; विद्यापीठाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहातगर्दीचा फायदा घेऊन सोन्याची गंठण चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेस अटककरवीर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादनहिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन...!डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलहिवाळी अधिवेशनात न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीचा प्रश्न मांडणार; सतेज पाटील : न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाला काँग्रेसचा पाठिंबा कोल्हापूर : साठमारी परिसरातील घरफाळ्याची थकबाकी न भरल्याने आठ गाळे सीलASDD प्रवर्गातील मतदारांना नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधीनिवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन हयातीचे दाखले सादर करावेत

जाहिरात

 

महिलांनी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचे लघुउद्योग सुरू करावेत : पूनमताई तोडकर

schedule18 Nov 26 person by visibility 167 categoryउद्योग

पन्हाळा तालुक्यातील असुर्ले येथे महिलांसाठी लघुउद्योग मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात 

पन्हाळा  : "महिलांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचे घरगुती लघुउद्योग सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. अंगभूत कौशल्यांचा योग्य वापर केल्यास उत्पन्नाची अनेक साधने निर्माण होऊ शकतात," असे प्रतिपादन नरेंद्र मोदी विचार मंचाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा स्वमन मानवाधिकार परिषदेच्या महिला अध्यक्षा  शर्विकाताई उर्फ पूनमताई तोडकर यांनी केले.

पन्हाळा तालुक्यातील असुर्ले गावात उदयसिंह सरनोबत सरकार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट आणि महिलांसाठी विशेष लघुउद्योग मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

सध्याच्या काळात महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध व्यवसाय संधी, घरगुती स्तरावर लघुउद्योग सुरू करण्याची पद्धत आणि त्यातून होणारी आर्थिक प्रगती याबाबत तोडकर यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळे गावातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नवी दिशा आणि प्रोत्साहन मिळाले आहे.

कार्यक्रमाच्या औचित्याने उदयसिंह सरनोबत सरकार यांच्या हस्ते  शर्विकाताई उर्फ पूनमताई तोडकर यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाचा मोलाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला असुर्ले परिसरातील महिला उपस्थित होत्या.

.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes