SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सीपीआर हॉस्पिटलचा हृदयरोग विभाग महाराष्ट्रात क्रमांक - 1; सर्वाधिक 11 TAVI यशस्वी शस्त्रक्रियाशिवाजी विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कौतुकास्पद: आनंदराव पाटील; विद्यापीठाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहातगर्दीचा फायदा घेऊन सोन्याची गंठण चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेस अटककरवीर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादनहिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन...!डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलहिवाळी अधिवेशनात न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीचा प्रश्न मांडणार; सतेज पाटील : न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाला काँग्रेसचा पाठिंबा कोल्हापूर : साठमारी परिसरातील घरफाळ्याची थकबाकी न भरल्याने आठ गाळे सीलASDD प्रवर्गातील मतदारांना नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधीनिवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन हयातीचे दाखले सादर करावेत

जाहिरात

 

ASDD प्रवर्गातील मतदारांना नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधी

schedule18 Nov 26 person by visibility 172 categoryराज्य

🟣 विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ; अंतिम मतदार यादी २२ डिसेंबरला प्रसिद्ध होणार

कोल्हापूर : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDD) प्रवर्गात समाविष्ट झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव न आलेल्या मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्याची आणखी एक संधी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली असून, संबंधित मतदारांनी विहित मुदतीत गणना प्रपत्र सादर करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने १४ मे २०२६ रोजीच्या पत्रान्वये राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानंतर १७ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या पत्रान्वये या कार्यक्रमास मुदतवाढ देऊन सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार ASDD प्रवर्गातील मतदारांसाठी गणना प्रपत्र तयार करणे व छपाईची प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार असून, प्राप्त प्रपत्रांवर कार्यवाही १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

दावे व हरकती निकाली काढण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२६ असून, अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या संबंधित मतदारांनी गणना प्रपत्र सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes