SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सीपीआर हॉस्पिटलचा हृदयरोग विभाग महाराष्ट्रात क्रमांक - 1; सर्वाधिक 11 TAVI यशस्वी शस्त्रक्रियाशिवाजी विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कौतुकास्पद: आनंदराव पाटील; विद्यापीठाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहातगर्दीचा फायदा घेऊन सोन्याची गंठण चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेस अटककरवीर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादनहिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन...!डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलहिवाळी अधिवेशनात न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीचा प्रश्न मांडणार; सतेज पाटील : न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाला काँग्रेसचा पाठिंबा कोल्हापूर : साठमारी परिसरातील घरफाळ्याची थकबाकी न भरल्याने आठ गाळे सीलASDD प्रवर्गातील मतदारांना नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधीनिवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन हयातीचे दाखले सादर करावेत

जाहिरात

 

कोल्हापूर : साठमारी परिसरातील घरफाळ्याची थकबाकी न भरल्याने आठ गाळे सील

schedule18 Nov 26 person by visibility 114 categoryमहानगरपालिका

◼️२९ लाख १५ हजार रुपयांची घरफाळा थकबाकी, गांधी मैदान विभागीय कार्यालयाची कारवाई

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली (घरफाळा) विभागामार्फत घरफाळ्याची थकबाकी वसुलीसाठी कारवाई तीव्र करण्यात आली आहे. 

या अंतर्गत घरफाळा विभागीय कार्यालय क्र. १, गांधी मैदान व उपद्रव शोध पथकाच्या संयुक्त पथकाने गोखले कॉलेजजवळील साठमारी परिसरातील सर्व्हे क्र. २६१२ मधील शेड मालक राजाराम गोविंद नाईक यांच्या आठ गाळ्यांवर सीलची कारवाई केली.

 संबंधित शेड मालकाकडे २९ लाख १५ हजार ३३ रुपयांची घरफाळा थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त परितोष कंकाळ व सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी अधीक्षक दत्तप्रसाद माजगावकर, विभागातील सर्व लिपिक तसेच उपद्रव शोध पथकाचे जवान उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes