SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सीपीआर हॉस्पिटलचा हृदयरोग विभाग महाराष्ट्रात क्रमांक - 1; सर्वाधिक 11 TAVI यशस्वी शस्त्रक्रियाशिवाजी विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कौतुकास्पद: आनंदराव पाटील; विद्यापीठाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहातगर्दीचा फायदा घेऊन सोन्याची गंठण चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेस अटककरवीर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादनहिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन...!डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलहिवाळी अधिवेशनात न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीचा प्रश्न मांडणार; सतेज पाटील : न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाला काँग्रेसचा पाठिंबा कोल्हापूर : साठमारी परिसरातील घरफाळ्याची थकबाकी न भरल्याने आठ गाळे सीलASDD प्रवर्गातील मतदारांना नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधीनिवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन हयातीचे दाखले सादर करावेत

जाहिरात

 

करवीर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

schedule18 Nov 26 person by visibility 182 categoryसामाजिक

कोल्हापूर  : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक ३ मधील बाल हनुमान मित्र मंडळाच्या हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शिवसैनिकांनी "अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब अमर रहे" आणि "परत या, परत या, बाळासाहेब परत या" अशा उत्स्फूर्त घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

आपले मनोगत व्यक्त करताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, "आम्हा शिवसैनिकांचे दैवत, युगपुरुष, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, मराठी मनाचे मानबिंदू आणि हिंदुस्थानचे महानेते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही विनम्र अभिवादन करतो."

या अभिवादन प्रसंगी तालुकाप्रमुख राजू यादव यांच्यासह बाळासाहेब नलवडे, दीपक पाटील, संतोष चौगुले, विक्रम चौगुले, अरविंद शिंदे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, शरद माळी, सागर पाटील, दत्ता फराकटे, प्रकाश मुदुगडे, अक्षय परीट, रामराव पाटील, नितीन निकम, धनंजय पाटील, अजित चव्हाण आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes