शिक्षणशास्त्र अधिविभागात महिला दिन साजरा
schedule10 Mar 26 person by visibility 105 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार ‘महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती’ या विषयावर जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी, ‘महिलांनी सक्षम, सुदृढ व आत्मनिर्भर असणे गरजेचे असल्याचे अध्यक्षीय मनोगतात सांगितले.
यावेळी येथील केआयटी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या माजी प्राध्यापक डॉ. विदुला स्वामी प्रमुख उपस्थित होत्या. त्यांच्या सहकाऱ्यांनी झाडांची प्रतिज्ञा, प्लास्टिक कचरामुक्तीसाठी आपले काम, स्टील बँक, प्रश्नमंजुषा, कल्की डेमो, पिरियड पॅन्टीज प्रबोधन, पर्यावरण संरक्षण शपथ याद्वारे प्रबोधन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन, कविता व चित्रफितीद्वारे महिलांचे विविध क्षेत्रातील योगदान याविषयी सादरीकरण केले. महिला दिनाचे औचित्य साधून विभागातील प्राध्यापक, शिक्षक, संशोधक व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला डॉ. रुपाली संकपाळ, डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. सुप्रिया पाटील, डॉ.विजय सदामते, सरस्वती कांबळे, सारिका पाटील, कादंबरी खांडेकर, ऋतिका धनगर, साबिया बागवान, आनंद कुंभार, संगीता चंदनवाले, संजना भालकर, संगीता माने, अतुल जाधव उपस्थित होते. राजनंदिनी व रुचिता थरोळी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रतिक्षा पाटील यांनी आभार मानले.