पुण्याची निहिरा कौल आणि मुंबईचा अर्जुन सिंग महाराष्ट्र राज्य 15 वर्षाखालील निवड फिडे रेटिंग अजिंक्यपद बुध्दिबळ स्पर्धेचे विजेते
schedule15 Sep 26 person by visibility 423 categoryक्रीडा
◼️"11 वर्षाचा सांगलीचा वरद पाटील राज्यात तिसरा"
कोल्हापूर : सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन, आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्यावतीने तसेच जी एच रायसोनी, कल्पना फौंडेशन पुरस्कृत 15 वर्षाखालील खुली आणि मुलींच्या स्वतंत्र फिडे रेटिंग निवड बुध्दिबळ स्पर्धा दि.11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर पर्यंत रेशीमगाठी सांस्कृतिक हॉल, स्फूर्ती चौक सांगली इथे पार पडली. बक्षीस वितरण कार्यक्रम *माजी न्यायाधीश तथा प्रमुख सांगली जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांच्या अध्यक्षते खाली व बिल्डर सुनील कोकितकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच रिअल इस्टेट व्यवसायिक निहाल महात आणि सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव चंद्रकांत वळवडे* यांच्या उपस्थितीत पार पडला.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेले खेळाडू 15 वर्षाखालील संपूर्ण राज्यातून तब्बल 249 मुले व मुली असे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. सदर स्पर्धेतील मुले 5 व मुली 4 यांची तेलंगणा इथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. सदर खेळाडू महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय स्पर्धेत नेतृत्व करतील.
मुलीच्या गटामध्ये निहिरा कौल पुणे विजेती, साई पाटील पुणे द्वितीय, वैघा बैजु रायगड तृतीय, मारगज प्रिशा मुंबई सब-अर्बन चतुर्थ, आदिना मोहन्ति पुणे पाचवी, वाघळे भूमिका छ. संभाजीनगर सहावी, कशिश सनप नाशिक सातवी, मायंका राणा पालघर आठवी, परिधी गांधी बुलढाणा नववी, संस्कृती सुतार कोल्हापूर दहावी.
खुल्या गटामध्ये अर्जुन सिंघ मुंबई सबअर्बन विजेता, अथर्व सोनी ठाणे द्वितीय, वरद पाटील सांगली तृतीय, आयान सोमाणी पुणे चतुर्थ, मार्मिक शाह पुणे पाचवा, ओम रामगुडे पुणे सहावा, कुशाग्र पालिवाल नागपूर सातवा, केविन माथीयाझगान पुणे आठवा, श्लोक माळी पुणे नववी, आदित्य चव्हाण सांगली दहावा.
या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी- रत्नागिरी, आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर - सांगली, राष्ट्रीय पंच करण परीट, इचलकरंजी, विजयकुमार माने, सांगली, अपर्णा शिंदे - सातारा, यश लोहाना - कराड, रोहित पोळ - इचलकरंजी, राज्य पंच नाझिया पटेल - मिरज, अनिता भोसले जांभळी, सुचेता देशपांडे यांनी काम केले.