SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहगोकुळ निवडणुक : स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या समाधीला माजी संचालकांचे अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला अभिवादनगणपती बाप्पा मोरया! राज्यभरात गणेशोत्सवाचा मंगल व उत्साही प्रारंभ; लाडक्या बाप्पाचे दणक्यात आगमनगोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय; नामनिर्देशन प्रक्रियेसाठी वाहतूक नियोजनसांगलीत महाराष्ट्र राज्य फिडे रेटिंग निवड बुद्धिबळ स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद; राज्यातील २५० खेळाडूंचा सहभागहुपरी येथील आरटीआय कार्यकर्त्यास गंभीर मारहाण करणारे तीन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईपहिल्या केन चेस सॉल्व्हिंग कपमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी; ६ विजेते घोषितकोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; ३ लाखांच्या एमडीसह तरुण अटकेतगणेश मंडळांना हवे सामाजिक प्रबोधनाचे भान... हिंदी भाषा: भारतीय संस्कृतीचा आणि एकतेचा अनमोल दुवा

जाहिरात

 

हुपरी येथील आरटीआय कार्यकर्त्यास गंभीर मारहाण करणारे तीन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

schedule14 Sep 26 person by visibility 472 categoryगुन्हे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील आरटीआय कार्यकर्त्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या तिघा संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:४० वाजण्याच्या सुमारास हुपरी येथील अंबाईनगर भागात राहणारे ६१ वर्षीय आरटीआय कार्यकर्ते अशोक बाजीराव खाडे हे जवाहर साखर कारखाना ते कारदगा जाणाऱ्या रस्त्यावरील गाडी अड्डा वस्तीजवळ चालत फिरत असताना, पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या  कारमधून आलेल्या इसमांनी त्यांना उजव्या खांद्यावर व दोन्ही पायांवर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून शिवीगाळ केली आणि गंभीर जखमी केले.

 या प्रकरणी फिर्यादी अशोक खाडे यांच्या तक्रारीवरून हुपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना समांतर तपासाचे योग्य मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या.

 त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तपास पथक स्थापन करून घटनास्थळी व कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमीची भेट घेऊन सविस्तर माहिती घेतली. तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता, पोलीस अंमलदार योगेश गोसावी व युवराज पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार जयकुमार ढंग आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी तात्काळ तपोवन मैदान, कोल्हापूर येथे सापळा रचून जयकुमार भारत ढंग (वय २८, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर), अभिजित बाळासो पाटील (वय ३४, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) आणि फिरोज उर्फ साजिद अल्लाबक्ष शेख (वय २५, रा. सरनाईक वसाहत, कोल्हापूर) या तीन आरोपींना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, अशोक खाडे व संशयित अमृत सावंत (रा. सांगली) यांच्यात पैशांच्या कारणावरून वितुष्ट असल्याने अमृत सावंत याच्या सांगण्यावरून आपण तिघांनी  कारमधून येऊन मारहाण केल्याची कबुली आरोपींनी दिली, ज्यामध्ये अमृत सावंत कारमध्येच बसला होता.

ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी हुपरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, यातील अमृत सावंत याचा शोध सुरू आहे. मुख्य आरोपी जयकुमार ढंग याच्यावर राजवाडा पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे एकूण ७ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व हुपरी पोलीस ठाण्याच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes