SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीई टेक्स्टाईलच्या आठ विद्यार्थ्यांची वर्धमान टेक्स्टाईल लि.कंपनीमध्ये निवडसामाजिक न्याय दिन साजरा करण्यासाठी कोल्हापूरवासीय सज्जमहिलांचे सशक्ती व सक्षमीकरणाला जिल्हा परिषद प्राधान्य देणार : डॉ जसमिनअग्निवीर भरती संदर्भात आढावा बैठक संपन्न१० हजार जणांना मिळणार रोजगारांची संधी ; आमदार यड्रावकरांच्या पाठपुराव्याला मोठे यशडी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरला प्रतिष्ठेची ‘आर्किटेक्ट लुईस आय. कान ट्रॉफीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज करावेतकोल्हापूरसह चार जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या सराईत चेन स्नॅचर टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी गजाआडपिरवाडी येथे हातभट्टी दारूविरुद्ध संयुक्त कारवाईजयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र देशात आदर्श ठरणार : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

जाहिरात

 

डीकेटीई टेक्स्टाईलच्या आठ विद्यार्थ्यांची वर्धमान टेक्स्टाईल लि.कंपनीमध्ये निवड

schedule22 Jun 26 person by visibility 79 categoryशैक्षणिक

  इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये बी. टेक. टेक्स्टाईल्सच्या ८ विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य व प्रतिष्ठित वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड, कॅम्पस मुलाखातीद्वारे निवड झाली आहे. लुधियाना (पंजाब) आणि भोपाळ येथील प्रकल्पासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सानिका नाईक, पारस मालमे, शंतनु देसाई, वेदांत पाटील, अनिश पाटील, सुमिरण पांडे, विरेंद्र पाटील व शुभम कोष्टी यांचा समावेश आहे.

   वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड ही वस्त्रोद्योग क्षेत्रातील देशातील अग्रगण्य कंपनी असून कंपनीची २२ हून अधिक उत्पादने देश विदेशात लोकप्रिय असून गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब आदी राज्यांमध्ये तिचे विस्तृत कार्यक्षेत्र आहे. यार्न, प्रोसेस्ड फॅब्रिक्स, शिवण धागे व अ‍ॅक्रिलिक फायबर निर्मितीत कंपनीचे विशेष योगदान आहे. डीकेटीई संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत उद्योगाभिमुख प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि उद्योग संस्थांशी चांगले हितसंबध प्रस्थापित केले आहेत याच बळावर विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये आकर्षक करिअर संधी प्राप्त होत आहेत. विद्यार्थ्यांना तृतीय वर्षातच समर इंटर्नशिपची संधी मिळते व उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे त्यांना प्री-प्लेसमेंट ऑफर दिली जाते.

  विद्यार्थ्यांना अग्रगण्य कंपन्यामध्ये चांगल्या पॅकेजवरती नोकरीच्या संधी उपलब्ध करुण देण्यास डीकेटीई ही संस्था अग्रेसर आहे. इंडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरअ‍ॅक्शनमुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या इंटरव्हयूवच्या वेळी आपली गुणवत्ता सिध्द करता येत आहे व यामुळे येथील विद्यार्थी प्लेसमेंटमध्ये आपली छाप पाडत आहेत असे गौरवोउदगार याप्रसंगी संचालिका डॉ एल.एस. आडमुठे यांनी व्यक्त केले.  
प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील व टीपीओ प्रा. एस.बी.अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes