पश्चिम महाराष्ट्रात वारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीस इंजिनिअरिंगच्या सर्वाधिक जागा
schedule01 Aug 25 person by visibility 503 categoryशैक्षणिक

▪️वारणेच्या कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयास विद्यार्थी आणि पालकांची प्रथम पसंती
वारणानगर : अभियांत्रिकीच्या प्रथम फेरीच्या प्रवेशात यावर्षी पश्चिम महाराष्ट्रात वारणा विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय कोरे अभियांत्रिकीस पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या व तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम वर्ष प्रवेशात विद्यार्थ्याची प्रथम पसंती मिळवुन पालक आणि विद्यार्थ्यांची विश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
प्रवेशाच्या पहिल्या दिवशी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालय परिसरात गर्दी केली होती मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रोनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन केमिकल, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, टीसीएस स्पॉन्सर्ड सीएसबीएस, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल शाखेत प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या, विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी व अभियांत्रिकीचे प्र.प्राचार्य डॉ. डी. Eएन. माने यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी , ऍडमिशन इन्चार्ज डॉ. ए. व्ही. पाटील,विविध विभागाचे विभाग प्रमुख, इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महाविद्यालयास वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांचे मार्गदर्शन व पाठबळ नेहमी मिळत असते. अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे यांचे सहकार्य लाभले.
डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी म्हणाले की महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या वारणा विद्यापीठाच्या पहिल्याच वर्षी प्रवेशास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व पश्चिम महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला.
गुणवत्तापूर्ण विद्यार्थी व व दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींना सोबत घेऊन परिपूर्ण व गुणवंत अभियंता तयार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असेन.
महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे सरासरी प्रत्येक वर्षी ६५० हून अधिक विद्यार्थ्यांचे विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड होते.महाविद्यालय दोन वेळा एनबीए, नॅक अ श्रेणी, इंडस्ट्री रेडी प्रोग्रॅम, मानांकन, नेहमीच गुणवत्ता पूर्ण शिक्षण व दर्जेदार सुविधा, सुसज्ज ग्रंथालय,अत्याधुनिक वसतिगृहे ,दळणवळण सुविधा ,उच्चांकि प्लेसमेंट, बी.टेक ओनर्स कोर्सेस, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार, स्पर्धा परीक्षा केंद्र, इनडोअर स्टेडियम, सेमी ओलंपियाड स्विमिंग पूल, नव्यानेच सुरु झालेले वारणा विज्ञान केंद्र आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निरनिराळे कार्यक्रम महाविद्यालयात सातत्याने आयोजित केले जातात असे त्यांनी पुढे सांगितले.