प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव; गणवेश वाटप
schedule02 Aug 25 person by visibility 212 categoryशैक्षणिक

▪️लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात
कोल्हापूर : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशालेतील वाङ्मय-विहार मंडळाच्या भित्तीपत्रकाच्या अनावरणाने झाले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस. आर. पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची आणि अण्णाभाऊ साठे यांच्या समाजप्रबोधनात्मक कार्याची माहिती आर. एच. पाटील यांनी विद्यार्थिनींना दिली.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने दहावी बोर्ड परीक्षेत ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शाळेमार्फत गरजू व होतकरू विद्यार्थिनींना गणवेशाचेही वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुण्या राधा मेस्त्री यांनी विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत आत्मविश्वास, परिश्रम आणि सातत्य ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच संस्थेचे सहसचिव एस. एस. चव्हाण यांनी प्रशालेच्या प्रगती विषयी गौरवोद्गार काढले. संस्था सचिव पी.एस. हेरवाडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. पी. बागी यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक ए.डी. भोई यांनी केले.