कागलचे उपनगराध्यक्ष प्रविण काळबर यांच्या वाढदिवसानिमित्त एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धा : श्रीराज, ऋषिकेश, प्रेम, अर्णव आघाडीवर
schedule02 Aug 25 person by visibility 179 categoryराज्य

कोल्हापूर : अनुज चेस ॲकॅडमीच्या सहकार्याने प्रवीण काळबर यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसीय खुली व १५ वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन मटकरी मंगल कार्यालय, कागल करण्यात आले होते. तिसऱ्या फेरीअखेर श्रीराज भोसले, ऋषिकेश कबनूरकर ,प्रेम निचलं आघाडीवर होते. या स्पर्धेचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झाले .
१५ वर्षाखालील गटात १०५ जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला .त्यापैकी ७ आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धक होते. खुल्या गटात १६ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू सह ४४ जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
▪️यावेळी विविध फेरीतील आत्तापर्यंत चा निकाल
▪️तिसऱ्या फेरी अखेर , ओपन गट - श्रीराज भोसले, ऋषिकेश कबनूरकर आघाडीवर
▪️१५ वर्षाखालील गट - प्रेम निचल, अर्णव पाटील आघाडीवर
या स्पर्धेचे वेळी मनोज फराकटे, प्रविण काळबर, सचिन मटकरी रविराज पिष्टे, प्रतिक नाळे, प्रतिक पाटील उपस्थित होते तसेच या स्पर्धेचे पंच म्हणून कृष्णात पाटील, बाबूराव पाटील, शैलेश व्हनकटी, अर्चना मोरे ,सुर्यकांत चोडणकर, सम्मेद पाटील काम पाहात आहेत.