कसाबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिरात एक राखी सीमेवरील जवानांसाठी उपक्रम उत्साहात
schedule02 Aug 25 person by visibility 114 category

कोल्हापूर : मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसाबा बावडा येथे आज शनिवारी एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमाचे उद्घाटन डायट कोल्हापूरच्या अधिव्याख्याता राणीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले राखी निर्मिती कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून द्वारकानाथ विठ्ठल भोसले हे होते तर ठाणेकर मळ्यातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते अजित ठाणेकर यांनी सदर कार्यशाळेस उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजित कुमार पाटील यांनी प्रात्यक्षिकांमध्ये अध्यापक तमेजा मुजावर, अमित पोटकुले, आर जी कीर्तिकर , विद्या पाटील, दिपाली यादव, उत्तम कुंभार यासर्वांसह सहभाग घेतला. या कार्यशाळेमध्ये एकूण 150 राख्यांची निर्मिती करण्यात आली या राख्या सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सीमेवरील जवानांना पाठविण्यात येणार असल्याचे माहिती मुख्याध्यापक डॉ. अजित कुमार पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जी.कीर्तीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.दिपाली यादव यांनी केले.