जनतेच्या लढ्याला यश : पालकमंत्री
schedule01 Aug 25 person by visibility 265 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूरात खंडपीठ व्हावे या मागणीसाठी कित्येक वर्षांपासून याठिकाणची जनता लढा देत आहे. यामध्ये त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी.
ही मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे आता कोल्हापूरात पहिल्या टप्प्यात सर्कीट बेंचला मंजुरी मिळाली असून कोल्हापूरात पुढच्या काळात खंडपीठ होण्यासाठीच्या पहिल्या टप्प्याला यश आले आहे असे म्हणावे लागेल. अशी प्रतिक्रिया पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
त्याचबरोबर या निर्णयामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील जनतेला त्याचा फायदा होणार आहे. हा निर्णय होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी केलेले प्रयत्नही तितकेच महत्वाचे आहेत. त्यामुळे ज्यांनी या लढ्यात योगदान दिले त्या कोल्हापूरच्या जनतेचेही आभार मानतो.
अशी प्रतिक्रिया पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.