SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भाजपाच्या वतीने १५ जून रोजी कोल्हापुरात ‘सेवा अभियान’खत विक्रीसाठी ऑफलाईन व्यवस्था सुरू करा : आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांचे लोकार्पणनशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रीय योगदान देईल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची ग्वाहीडीकेटीईमध्ये मी राजवाडा बोलतोय ओपन हाउस उपक्रमास विक्रमी प्रतिसादशिवाजी विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी २४ जूनला पुनर्प्रवेश परीक्षाआंतरराष्ट्रीय जनसंपर्क (PR) दिवस: संवादाच्या पलीकडचे एक व्यावसायिक पर्वकोल्हापूर: महायुतीची अमित शहांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी; पाणी टंचाईवर मंत्री मुश्रीफ यांचे आश्वासनराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीनूतन इमारतीच्या बांधकामासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही - मंत्री चंद्रकांतदादा पाटील

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी २४ जूनला पुनर्प्रवेश परीक्षा

schedule13 Jun 26 person by visibility 124 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे अधिविभाग व संलग्न महाविद्यालयांतील विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी उपलब्ध असलेल्या रिक्त जागांच्या प्रवेशासाठी पुनर्प्रवेश परीक्षा बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित करण्यात आली आहे.

या पुनर्प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. १३ जून ते २० जून २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावेत. विद्यार्थ्यांना केवळ एका अभ्यासक्रमासाठीच प्रवेश परीक्षा देता येणार आहे, अशी सूचना विद्यापीठाने दिली आहे.

▪️पुढील अभ्यासक्रमांसाठी पुनर्प्रवेश परीक्षा होणार आहे.

1. एम.एस्सी. भौतिकशास्त्र, 
2. एम.एस्सी. रसायनशास्त्र (औद्योगिक / उपयोजित / अजैविक / सेंद्रिय / भौतिक / विश्लेषणात्मक)
3. एम.एस्सी. वनस्पतिशास्त्र
4. एम.एस्सी. प्राणिशास्त्र
5. एम.एस्सी. नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान
6. एम.एस्सी. सांख्यिकी (फक्त महाविद्यालय स्तरावरील अभ्यासक्रम)
7. एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स
8. एम.एस्सी. जैवरसायनशास्त्र / जैवतंत्रज्ञान
9. एम.एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र / औषधनिर्माण सूक्ष्मजीवशास्त्र
10. एम.एस्सी. पर्यावरण विज्ञान
11. एम.एस्सी. कृषी रसायनशास्त्र व कीड व्यवस्थापन
12. एम.एस्सी. संगणकशास्त्र
13. एम.ए. योगशास्त्र
14. वैद्यकीय माहिती व्यवस्थापन
15. बी.एस्सी.–एम.एस्सी. अर्थशास्त्र (एकात्मिक पाच वर्षीय अभ्यासक्रम)
16. ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी (बी.लिब. अँड इन्फॉर्मेशन सायन्स)
17. एम.एस्सी. गणित / संगणक अनुप्रयोगासह गणित
18. मास्टर ऑफ सोशल वर्क (एम.एस.डब्ल्यू.) – यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट
19. एम.बी.ए. ग्रामीण व्यवस्थापन (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट)
20. एम.टेक. ग्रामीण तंत्रज्ञान (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट)
21. एम.ए. जनसंज्ञापन (मास कम्युनिकेशन)
22. एम.एस्सी. अन्न विज्ञान व तंत्रज्ञान
23. एम.ए. प्रवास व पर्यटन अभ्यास
24. एम.ए. रशियन भाषा
25. एम.ए./एम.एस्सी. भूगोल
26. पत्रकारिता पदवी अभ्यासक्रम (बॅचलर ऑफ जर्नालिझम)
27. पत्रकारिता पदव्युत्तर अभ्यासक्रम (मास्टर ऑफ जर्नालिझम)
28. एम.एस्सी. भू-माहितीशास्त्र (जिओइन्फॉर्मेटिक्स)
29. एम.एस्सी. अर्थशास्त्र (लॅटरल एन्ट्री)

याशिवाय, ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येत नाही, अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दि. ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित अधिविभागाशी संपर्क साधावा.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ही पुनर्प्रवेश प्रक्रिया अंतिम असून यानंतर पुन्हा पुनर्प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
प्रवेश प्रक्रिया, रिक्त जागांचा तपशील आणि अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेश संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा प्रवेश विभागाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६०९१४२ / ९४४९ / ९४८८ यांवर संपर्क साधावा, असे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes