SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भाजपाच्या वतीने १५ जून रोजी कोल्हापुरात ‘सेवा अभियान’खत विक्रीसाठी ऑफलाईन व्यवस्था सुरू करा : आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांचे लोकार्पणनशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रीय योगदान देईल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची ग्वाहीडीकेटीईमध्ये मी राजवाडा बोलतोय ओपन हाउस उपक्रमास विक्रमी प्रतिसादशिवाजी विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी २४ जूनला पुनर्प्रवेश परीक्षाआंतरराष्ट्रीय जनसंपर्क (PR) दिवस: संवादाच्या पलीकडचे एक व्यावसायिक पर्वकोल्हापूर: महायुतीची अमित शहांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी; पाणी टंचाईवर मंत्री मुश्रीफ यांचे आश्वासनराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीनूतन इमारतीच्या बांधकामासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही - मंत्री चंद्रकांतदादा पाटील

जाहिरात

 

भाजपाच्या वतीने १५ जून रोजी कोल्हापुरात ‘सेवा अभियान’

schedule13 Jun 26 person by visibility 178 categoryराजकीय

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांच्या विविध प्रलंबित शासकीय व शैक्षणिक प्रश्नांच्या निवारणासाठी ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या प्रलंबित शासकीय, शैक्षणिक तसेच विविध विभागांशी संबंधित समस्या व मागण्यांची निवेदने भाजपा पदाधिकारी अथवा जिल्हाध्यक्षांकडे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. अभियानादरम्यान श्री. संतोष साखरे हे नागरिकांकडून निवेदने स्वीकारणार असून प्राप्त निवेदनांचा संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून त्यांची कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
हे ‘सेवा अभियान’ सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत भारतीय जनता पार्टी कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांचे निराकरण व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या समस्या व मागण्यांची निवेदने सादर करावीत,असे आवाहन कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष  विजय जाधव, कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्ष  राजवर्धन निंबाळकर, कोल्हापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष  नाथाजी पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes