आजरा येथे मंगळवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
schedule19 Jun 26 person by visibility 136 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर आणि आजरा महाविद्यालय, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने 23 जून रोजी सकाळी 10 ते दु. 2 या वेळेत आजरा महाविद्यालय येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये 7 खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून 129 रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 8 वी, 12 वी, आय.टी.आय, डिप्लोमा, बी.टेक तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 3 प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले .