SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद!श्री अंबाबाई मंदिरातील विविध विकास कामांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार शुभारंभशालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार; राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभशिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेसाठी असलेली अधिवास प्रमाणपत्राची अट रद्दकोल्हापूर : जलजन्य व किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांसाठी जाहीर आवाहनजागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त मंगळवारी क्रीडा ज्योत रॅलीआजरा येथे मंगळवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनडी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा 42 वर्षांचा प्रवास अभिमानास्पद; डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रतिपादन, 43 वा स्थापना दिन उत्साहातराजर्षी शाहू व्याख्यानमाला व पुरस्कारासाठी करवीरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनकसबा कोडोली नगरपरिषद प्रस्तावावर उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; शासनाला सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश

जाहिरात

 

कसबा कोडोली नगरपरिषद प्रस्तावावर उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; शासनाला सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश

schedule19 Jun 26 person by visibility 131 categoryसामाजिक

कोल्हापूर : कसबा कोडोली ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्यासाठी गेल्या चार दशकांपासून सुरू असलेल्या नागरिकांच्या प्रयत्नांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रलंबित प्रस्तावावर सक्षम प्राधिकरणाने कायद्यानुसार सहा महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत.

याबाबतची जनहित याचिका (PIL) स्वप्नील गणपतराव सातवेकर यांनी दाखल केली होती, तर संदीप चंद्रकांत मोहिते आणि जयदीप मोहिते यांनी विविध कागदपत्रे, अहवाल आणि ऐतिहासिक नोंदी सादर करून या प्रस्तावाला भक्कम आधार दिला.

 सुनावणीदरम्यान, २७ जानेवारी १९९३ रोजी नगरपरिषद स्थापनेसाठी काढलेले राजपत्र आणि २ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे सादर केलेला सविस्तर प्रस्ताव न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला.
कोडोलीची वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, व्यापारी विकास आणि पायाभूत सुविधांचा विचार करता, न्यायालयाच्या या निर्णयामुळे नगरपरिषद स्थापनेच्या प्रक्रियेला गती मिळणार असून, हे स्थानिकांच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. धैर्यशील सुतार आणि त्यांच्या कायदेशीर टीमने प्रभावीपणे बाजू मांडली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes