SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद!श्री अंबाबाई मंदिरातील विविध विकास कामांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार शुभारंभशालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार; राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभशिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेसाठी असलेली अधिवास प्रमाणपत्राची अट रद्दकोल्हापूर : जलजन्य व किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांसाठी जाहीर आवाहनजागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त मंगळवारी क्रीडा ज्योत रॅलीआजरा येथे मंगळवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनडी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा 42 वर्षांचा प्रवास अभिमानास्पद; डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रतिपादन, 43 वा स्थापना दिन उत्साहातराजर्षी शाहू व्याख्यानमाला व पुरस्कारासाठी करवीरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनकसबा कोडोली नगरपरिषद प्रस्तावावर उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; शासनाला सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा 42 वर्षांचा प्रवास अभिमानास्पद; डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रतिपादन, 43 वा स्थापना दिन उत्साहात

schedule19 Jun 26 person by visibility 165 categoryशैक्षणिक

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची 42 वर्षांची वाटचाल अतिशय अभिमानास्पद आहे. या महाविद्यालयाने आतापर्यंत सुमारे 25 हजार अभियंते घडवले असून ते आज भारतासह जगभर विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, याचे फार मोठे समाधान वाटते, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी केले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 43 व्या स्थापना दिन कार्यक्रमात डॉ. पाटील बोलत होते. 

यावेळी डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते केक कापून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. ते म्हणाले, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी 1984 मध्ये कसबा बावडा येथे सुरू केलेल्या ग्रुपच्या या पहिल्या महाविद्यालयाने प्रगतीचे उच्चांक गाठले आहेत. 

डॉ. पाटील म्हणाले, केवळ 240 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आज 5 हजार 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विश्वस्त  ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने मोठी प्रगती केली आहे.  उत्कृष्ट शिक्षण, उत्तम पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान याद्वारे नजीकच्या काळात आणखी वेगाने प्रगती करुया असे आवाहन त्यांनी केले. 

कार्यकारी संचालक व डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले,  गुणवत्तेच्या बळावरच महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ (वॉशिंग्टन अॅकॉर्ड) हे प्रतिष्ठेचे मानांकन अलीकडेच मिळाले आहे. त्याचबरोबर  ‘नॅक’ मानांकन, तसेच युजीसीकडून स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. यापुढे आणखी चांगली प्लेसमेंट, संशोधन, इनोव्हेशन या माध्यमातून  महाविद्यालयाचा नावलौकिक आणखी वाढविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

स्वागत आणि सूत्रसंचालन रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांनी केले. प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी आभार मानले.  

यावेळी अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा,  कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, सीएचआरओ श्रीलेखा साटम,  डॉ. महादेव नरके, अभय जोशी, डॉ. अद्वैत राठोड, प्रा. रविंद्र बेन्नी यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes