SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
यड्राव बँक उद्योजक घडविण्यात आघाडीवर : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर; यड्राव को-ऑप. बँकेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्नथायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेल्या कोपार्डे गावच्या पैलवान गौरव पाटीलचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सत्कार१२ वी PCB नंतर करिअरच्या अमर्याद संधी : डॉ. आर. के. शर्मासंभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची पूरग्रस्त भागांची पाहणी : यंत्रणेला सतर्कतेच्या सूचनाबाल संरक्षण व्यवस्थेचा सविस्तर आढावा सादर करावा : राज्य बाल हक्क संरक्षण आयोगकोल्हापुरात मुसळधार पावसाचा जोर कायम; ३३ बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पातळी ३० फुटांवरशिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हानांचा शिक्षकांनी अवलंब करावा : मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहनभ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन: करवीर तालुका अध्यक्षपदी मन्सूर सय्यद यांची नियुक्तीकसबा सांगावच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करूडिग्री इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट शासनमान्य स्क्रुटनी केंद्र

जाहिरात

 

१२ वी PCB नंतर करिअरच्या अमर्याद संधी : डॉ. आर. के. शर्मा

schedule05 Jul 26 person by visibility 156 categoryशैक्षणिक

  ◼️डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात मार्गदर्शन सेमिनार उत्साहात ; डॉ. अजित पाटील यांनी दिली विविध करिअर संधींची माहिती

  कोल्हापूर : १२ वी विज्ञान (PCB) नंतर केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे, हेल्थकेअर, अलाईड हेल्थ सायन्सेस, हॉस्पिटॅलिटी आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांमध्ये करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. आरोग्य क्षेत्र हे भविष्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र असून मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी १२ वी PCB नंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींचा सविस्तर माहिती दिली.

  कदमवाडी येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये रविवारी झालेल्या "१२ वी PCB नंतरच्या करिअर संधी" या विषयावरील सेमिनाराला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थी व पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सेमिनारचा शुभारंभ करण्यात आला.

  डॉ. शर्मा म्हणाले, आरोग्य क्षेत्र हे सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. विद्यार्थांनी आवड, क्षमता व संधी लक्षात घेऊन योग्य करिअर निवडावे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, आधुनिक सुविधा, संशोधनाच्या संधी आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

  कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, योग्य करिअर मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर होऊन आत्मविश्वासाने भविष्याचा निर्णय घेण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांना योग्य दिशा मिळेल.

 प्रमुख मार्गदर्शक डॉ. अजित पाटील यांनी फार्मसी, फिजिओथेरपी, नर्सिंग, हॉस्पिटॅलिटी, संशोधन क्षेत्र, अभियांत्रिकी, मॅनेजमेंट तसेच देश-विदेशातील उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधींची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक पर्यायांवर अवलंबून न राहता बदलत्या काळातील नव्या करिअर क्षेत्रांचा अभ्यास करून योग्य दिशा निवडावी, असे आवाहन केले.

  आरोग्य क्षेत्र हे सर्वात मोठा सन्मान देणारे आणि सर्वाधिक संधी असलेले क्षेत्र आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि संशोधन या माध्यमातून डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून उत्तम करिअर घडविण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन विद्यापीठातील योग्य अभ्यासक्रम निवडावा असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, क्लिनिकल प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली.

  यावेळी फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अमृत कुंवर रायजादे, नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्य प्रा. मनिषा बिजापूरकर, फार्मसी कॉलेजचे डॉ. अभिनंदन पाटील, स्कूल ऑफ हॉस्पीटलीटीचे प्राचार्य रुधिर बारदेसकर, स्कूल ऑफ इंजिनिआरिंग अँड मॅनेजमेंटचे विभागप्रमुख प्रा. अभिजित मटकर, सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरीचे अधिष्ठाता डॉ. सी. डी. लोखंडे यांनी विद्यापीठात उपलब्ध अभ्यासक्रम, सुविधा, करिअर संधी याबाबत मार्गदर्शन केले.

  सेमिनारनंतर विद्यार्थी व पालकांनी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि कॅम्पसमधील विविध विभागांना भेट दिली.अत्याधुनिक सिम्युलेशन लॅब, आधुनिक प्रयोगशाळा, अध्यापन सुविधा आणि रुग्णसेवेची कार्यपद्धती जवळून पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधत प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या संधींबाबतच्या शंकांचे निरसन करून घेतले. प्रा. सुरज यादव व प्रा मैथिली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अजित पाटील यांनी आभार मानले.

  यावेळी रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील, स्कूल ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव, नर्सिंग प्राचार्य डॉ. उमाराणी जे., उपकुल सचिव संजय जाधव, जयदीप पाटील, यांच्यासह विद्यार्थी, पालक, विविध विभागांचे अधिकारी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes