भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन: करवीर तालुका अध्यक्षपदी मन्सूर सय्यद यांची नियुक्ती
schedule05 Jul 26 person by visibility 278 categoryसामाजिक
कोल्हापूर : 'भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य' या सामाजिक संघटनेच्या करवीर तालुका अध्यक्षपदी मन्सूर सय्यद यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली असून, लोकशाहीचे रक्षण करणे, जनहितासाठी सत्यनिष्ठेने कार्य करणे आणि भ्रष्टाचारविरोधी चळवळ तळागाळातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
मन्सूर सय्यद यांच्या निवडीनंतर करवीर तालुक्यात भ्रष्टाचारविरोधी जनजागृती आणि सामाजिक उपक्रम अधिक जोमाने राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.