SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
यड्राव बँक उद्योजक घडविण्यात आघाडीवर : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर; यड्राव को-ऑप. बँकेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्नथायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेल्या कोपार्डे गावच्या पैलवान गौरव पाटीलचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सत्कार१२ वी PCB नंतर करिअरच्या अमर्याद संधी : डॉ. आर. के. शर्मासंभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची पूरग्रस्त भागांची पाहणी : यंत्रणेला सतर्कतेच्या सूचनाबाल संरक्षण व्यवस्थेचा सविस्तर आढावा सादर करावा : राज्य बाल हक्क संरक्षण आयोगकोल्हापुरात मुसळधार पावसाचा जोर कायम; ३३ बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पातळी ३० फुटांवरशिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हानांचा शिक्षकांनी अवलंब करावा : मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहनभ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन: करवीर तालुका अध्यक्षपदी मन्सूर सय्यद यांची नियुक्तीकसबा सांगावच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करूडिग्री इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट शासनमान्य स्क्रुटनी केंद्र

जाहिरात

 

थायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेल्या कोपार्डे गावच्या पैलवान गौरव पाटीलचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सत्कार

schedule05 Jul 26 person by visibility 181 categoryसामाजिक

कोल्हापूर  : करवीर तालुक्यातील कोपार्डे गावचा  पैलवान आणि सेना केसरी पैलवान गौरव पाटील हा कोपार्र्डेच्या कुस्ती संकुल केंद्रात सराव करतो. गौरव पाटील यानं थायलंडमध्ये झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना ७५ किलो वजन गटात ग्रीको रोमन प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. कोपार्डे गावच्या मातीत घाम गाळून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिणार्‍या पैलवान गौरवचे कुस्तीप्रेमींसह विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. 

खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पैलवान गौरवचा आज सत्कार करण्यात आला आणि जागतिक पातळीवरील कुस्त्यांसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. मेहनत, चिकाटी आणि अखंड देशप्रेमाच्या जोरावर मिळवलेलं गौरवचं यश केवळ कोपार्डे गावाचीच नाही, तर संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचवणारं आहे. गौरवनं आणखी यश संपादन करावं, यासाठी महाडिक परिवार त्याच्या पाठीशी असेल, असे उद्गार खासदार महाडिक यांनी काढले. 

यावेळी पैलवान गुंडाजी पाटील, मारुती ऊर्फ बट्टू जाधव, बाबा शिरगांवकर, प्रा. सिकंदर कांबळे, अथर्व पाटील, समर्थ शिरगांवकर, राजू सूर्यवंशी, सर्वेश कांबळे, समर वाडेकर, शंतनू खोमडे, आर्यन मांडवे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes