विद्यापीठाच्या काळसेकर पुरस्कारांचे २९ सप्टेंबरला वितरण
schedule23 Sep 26 person by visibility 192 categoryराज्य
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२६ च्या काळसेकर पुरस्कारांचा वितरण समारंभ येत्या २९ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार आहे. ही माहिती मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी दिली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारे २०२६ सालचे सतीश काळसेकर काव्य पुरस्कार आणि ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार हे अनुक्रमे ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर आणि कवी रवी कोरडे यांना यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक, कवी, समीक्षक प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते येत्या मंगळवारी (दि. २९) विद्यापीठाच्या गणित अधिविभागातील रामानुजन सभागृहात सकाळी १०.३० वाजता पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत असतील. आदित्य काळसेकर यांच्यासह काळसेकर कुटुंबीयही समारंभास उपस्थित राहणार आहेत.